तंबाखू खाऊन कुजलेले दात आठवडाभरात होतील स्वच्छ! ५ रुपयांच्या तुरटीचा 'या' पद्धतीने करा वापर, दातांच्या समस्या होतील गायब
शरीराच्या स्वच्छतेसोबतच दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा फार आवश्यक आहे. बऱ्याचदा चेहरा, हात ,पाय आणि त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण दातांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर अन्नाचे कण दातांमध्ये तसेच अडकून राहतात, ज्याच्या परिणामामुळे दात खराब होऊन जातात. दातांवर वाढलेला पिवळेपणा, हिरड्यांमध्ये वेदना, दातांमधून रक्त येणे, दात दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. दातांवर पिवळा थर आणि चिकटपणा वाढल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो आणि दात खराब दिसू लागतात. याशिवाय अनेकांना सतत तंबाखू आणि गुटखा खाण्याची खूप जास्त सवय असते. वारंवार तंबाखू खाल्ल्यामुळे दातांवर किळसवाणा चिकट थर साचून राहतो.(फोटो सौजन्य – istock)
शरीराच्या स्वच्छतेसोबतच दातांच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. दातांवरील पिवळ्या थरांमुळे दातांचा नैसर्गिक पांढरेपणा कमी होऊन जातो आणि दात घाणेरडे दिसू लागतात. बऱ्याचदा दातांवर साचून राहिलेला हा चिकट थर ब्रश किंवा इतर कोणतेही उपाय करून सुद्धा कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांच्या स्वच्छतेसाठी तुरटीचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. खराब झालेले दात सुधारण्यासाठी इतर कोणत्याही ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे दातांवर वाढलेला काळेपणा आणि चिकट थर कमी होण्यास मदत होईल.
दातांवर जमा झालेला पिवळा चिकट थर कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे तोंडातील घाण वास आणि दातांच्या इतर सर्व समस्यांपासून आराम मिळतो. वर्षानुवर्षे दातांवर साचून राहिलेला चिकटपणा कमी करण्यासाठी बॅक्टेरिया आणि काही प्रमाणात डाग कमी तुरटीचा वापर करावा. तुरटीमध्ये असलेले नॅचरल क्लिंझिंग आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म दातांमध्ये वाढलेले हानिकारक विषाणू २ मिनिटांमध्ये नष्ट करून टाकते. घाणीमुळे जमा झालेला पिवळा चिकट थर कायमचा काढून दात स्वच्छ आणि मोत्यासारखे पांढरे शुभ्र करते.
दातांना कीड लागणे, वेदना, कॅव्हिटी आणि पिवळेपणा दूर चिमूटभर तुरटीचा वापर करावा. यासाठी एक ग्लास पाण्यात तुरटी पावडर मिक्स करून त्याच्या गुळण्या करून घ्या. पाण्यात तुम्ही लवंगसुद्धा टाकू शकता. गुळण्या केल्यामुळे दातांवर जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच आठवड्यातून तीनदाच तुरटी पाण्याच्या गुळण्या कराव्यात. जास्त तुरटीचे सेवन केल्यास दात कमकुवत होऊ शकतात.
तुरटीच्या पाण्याव्यतिरिक्त तुरटीचा दंतमंजन म्हणून सुद्धा वापर केला जातो. तुरटीची पावडर तव्यावर हलकीशी भाजा.त्यानंतर भाजलेली पावडर टूथपेस्टवर घेऊन दात स्वच्छ घासून घ्या आणि गुळण्या करून दात स्वच्छ करावेत. याशिवाय तुरटीमध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोणत्याही महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी तुरटीचा वापर करावा.






