Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे असलेले शिव कचहरी मंदिर हे अनोख्या रहस्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या शिवलिंगांची संख्या प्रत्येक वेळी बदलते, म्हणूनच हे मंदिर आस्था आणि चमत्काराचे अद्भुत केंद्र मानले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 20, 2025 | 08:22 AM
भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य

भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील प्रयागराज येथे एक रहस्यमयी मंदिर वसले आहे
  • मंदिराची खासियत म्हणजे इथे नेहमीच शिवलिंगाची संख्या बदलत राहते.
  • मंदिराचा अद्वितीय अनुभव घेण्यासाठी अनेक भाविक मंदिराला भेट देतात.
भारताला मंदिरांची आणि चमत्कारांची भूमी म्हटले जाते. देशातील प्रत्येक राज्य, शहर किंवा गावात एखादे तरी असे धार्मिक स्थळ आढळते, ज्याच्या भोवती श्रद्धा, आख्यायिका किंवा रहस्य गुंफलेले असते. काही मंदिरे त्यांच्या अनोख्या रचनेमुळे प्रसिद्ध आहेत, काही ऐतिहासिक कथांमुळे ओळखली जातात, तर काही आजही लोकांसाठी एक न उलगडलेली कोडीच आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात असेच एक रहस्यमय शिवमंदिर आहे, जे भक्तांसाठी केवळ श्रद्धेचे नव्हे तर अद्भुत अनुभवाचे केंद्र मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले असंख्य शिवलिंग, ज्यांची अचूक संख्या आजतागायत कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही.

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय

सामान्यतः एखाद्या मंदिरात एकच शिवलिंग असते, तर काही ठिकाणी दोन किंवा तीन शिवलिंगही आढळतात. मात्र या मंदिरात शेकडो शिवलिंग आहेत आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची संख्या प्रत्येक वेळी मोजताना बदलते. कधी २४३, कधी २८३, तर कधी त्याहूनही अधिक अशी वेगवेगळी संख्या समोर येते. त्यामुळे हे मंदिर केवळ पूजास्थान न राहता एक रहस्य आणि चमत्काराचे प्रतीक बनले आहे. भक्त याला भगवान शिवांचा दरबार मानतात आणि येथे दर्शनासाठी येणारे लोक केवळ पूजा करण्यासाठीच नाही, तर हा अद्वितीय अनुभव अनुभवण्यासाठी येतात.

शिव कचहरी मंदिराचा इतिहास

या अनोख्या मंदिराची स्थापना इ.स. १८६५ साली नेपाळचे राजा राणा सेनापती पद्म जंग बहादुर यांनी केली, असे मानले जाते. मंदिर उभारण्यामागे एक खास संकल्पना होती. भगवान शिवांचे विविध रूप एकाच ठिकाणी प्रकट व्हावेत, या उद्देशाने येथे वेगवेगळ्या स्वरूपातील शिवलिंगांची स्थापना करण्यात आली. काळाच्या ओघात हे मंदिर स्थानिक लोकांपुरते मर्यादित न राहता दूर-दूरवरून येणाऱ्या भाविकांमध्येही प्रसिद्ध झाले.

बदलणारी शिवलिंगांची संख्या

या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे येथे असलेल्या शिवलिंगांची कायम बदलणारी संख्या. अनेक भाविक, अभ्यासक आणि जिज्ञासूंनी शिवलिंग मोजण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी वेगवेगळी संख्या समोर आली. काहींच्या मते हा डोळ्यांचा भास असू शकतो, तर पुजारी आणि श्रद्धाळू याला भगवान शिवांची लीला मानतात.
असेही सांगितले जाते की एकाच व्यक्तीने दोन वेळा मोजणी केली तरी दोन्ही वेळची संख्या वेगळी येते. त्यामुळे आजपर्यंत कोणीही खात्रीपूर्वक असे सांगू शकलेले नाही की या मंदिरात नेमकी किती शिवलिंगे आहेत.

शिवाच्या विविध रूपांचे दर्शन

शिव कचहरी मंदिरात भगवान शिवांचे अनेक रूप दर्शवणारी शिवलिंगे आहेत. येथे चंदेश्वर, सिद्धेश्वर, नागेश्वर तसेच शहीद भगवान अशा विविध नावांनी ओळखली जाणारी शिवलिंगे आढळतात. एका जागी शिवाच्या इतक्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन होणे हे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. म्हणूनच भक्त या मंदिराला ‘शिवांचा दरबार’ म्हणतात.

भगवान रामांशी जोडलेली पवित्र कथा

या मंदिराशी संबंधित एक पौराणिक कथा याला आणखी महत्त्व प्राप्त करून देते. मान्यतेनुसार, लंकेवर विजय मिळवून अयोध्येकडे परतताना रावण वधामुळे भगवान रामांवर ब्रह्महत्येचा दोष लागला होता. या दोषातून मुक्त होण्यासाठी महर्षी भारद्वाज यांनी त्यांना पृथ्वीवर एक कोटी शिवलिंगांची स्थापना करून पूजा करण्याचा सल्ला दिला.
असे सांगितले जाते की प्रयागराजातील शिवकुटी परिसरात भगवान रामांनी कोटेश्वर महादेवाची स्थापना केली आणि हाच परिसर पुढे शिव कचहरी मंदिर म्हणून ओळखला जाऊ लागला. भक्तांचा विश्वास आहे की येथे मनोभावे केलेली पूजा मोठ्यात मोठे दोषही दूर करते.

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

आजही श्रद्धा आणि चमत्काराचे केंद्र

आजच्या काळातही शिव कचहरी मंदिर हे भाविकांसाठी अपार श्रद्धेचे स्थान आहे. विशेषतः श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पाहायला मिळते. अनेकजण आपल्या इच्छा, संकटे आणि आशा घेऊन येथे येतात आणि सच्च्या मनाने केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. मंदिरातील वातावरण शांतता, ऊर्जा आणि भक्तीने भरलेले असल्याची अनुभूती अनेक भाविक व्यक्त करतात. म्हणूनच शिव कचहरी मंदिर आजही आस्था, रहस्य आणि चमत्कार यांचे अनोखे संगमस्थान म्हणून ओळखले जाते.

Web Title: Temple where shivling count changes shiv kacheri prayagraj travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • Prayagraj
  • Shivlinga
  • temple
  • travel news

संबंधित बातम्या

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव
1

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

International Migrants Day : 28 कोटी ‘अज्ञात नायकांचा’ जागतिक प्रगतीत मोठा वाटा; जाणून घ्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे मोलाचे योगदान
2

International Migrants Day : 28 कोटी ‘अज्ञात नायकांचा’ जागतिक प्रगतीत मोठा वाटा; जाणून घ्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे मोलाचे योगदान

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या
3

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय
4

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.