छातीमध्ये जमा झालेला कफ होईल कायमचा नष्ट! 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम
बदलते वातावरण, आहारात होणार बदल, सतत थंड पदार्थांचे सेवन, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला आणि अंगदुखीचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. तसेच थंड पाणी किंवा थंड पेयांचे सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. सर्दी झाल्यानंतर वारंवार नाकातून पाणी येणे, घसा खवखवणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. बऱ्याचदा शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. तर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण मेडिकलमधील गोळ्यांचे सेवन न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा.(फोटो सौजन्य – istock)
रात्रीच्या वेळी लवकर झोप येत नाही? अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार,
सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. स्वयंपाक घरातील आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुणकारी पदार्थ शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. हे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करतात. याशिवाय सर्दी, खोकला आणि हानिकारक विषाणूंसोबत लढण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
सर्दी, खोकला किंवा साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या औषध न खाता आलं आणि मधाचे सेवन करावे. यासाठी चमचाभर आल्याचा रस काढून त्यात मध मिक्स करून घ्या. तयार केलेले चाटण दिवसभरात दोन ते तीन वेळा सेवन केल्यास घशात वाढलेली खवखव आणि सर्दीपासून तात्काळ आराम मिळेल. घशाला आलेली सूज कमी करण्यासाठी आल्याचे सेवन करावे. याशिवाय आलं शरीरात उष्णता निर्माण करते. नाक गळती किंवा साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आलं आणि मधाच्या मिश्रणाचे सेवन करावे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा गरम पाण्याची किंवा ओव्याच्या पाण्याची वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे सर्दी पातळ होते आणि शरीरसुद्धा अनेक फायदे होतात. नाक बंद होणे, छातीमध्ये जडपणा जाणवणे किंवा वारंवार डोकं दुखत असेल तर गरम पाण्याची किंवा ओव्याचे पाणी गरम करून वाफ घ्यावी. याशिवाय गरम पाण्यात तुम्ही पुदिन्याची पाने सुद्धा टाकू शकता. यामुळे छातीमध्ये साचून राहिलेला कफ मोकळा होतो आणि फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर दुधाच्या चहाचे सेवन करण्याऐवजी तुळस आणि काळीमिरीच्या चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. याशिवाय सर्दी, खोकला आणि साथीच्या इतर आजारांपासून सुटका मिळेल. काढा बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात तुळस, काळीमिरी आणि इतर मसाले टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेला काढा गाळून त्यात मध टाकून मिक्स करा. हा काढा नियमित सेवन प्यायल्यास छातीमध्ये जमा झालेला कफ कमी होईल.
घसा खवखवल्यास कोणते उपाय करावे?
गरम मीठाच्या पाण्याने गुळण्या करा, मध आणि लिंबू गरम पाण्यातून घ्या, गरम पाण्याची वाफ घ्या, आवश्यक असल्यास, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषध घ्या.
सर्दी खोकला झाल्यानंतर डॉक्टरांना कधी भेटायचे?
जर खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल.खोकल्यासोबत छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल. खोकल्यातून रक्त येत असेल.
सर्दी खोकला झाल्यानंतर काय करावे?
सर्दी आणि खोकल्यासाठी घरगुती उपचार तात्पुरता आराम देतात, परंतु गंभीर लक्षणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.सर्दी आणि खोकल्याच्या काळात, विश्रांती घेणे आणि भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. सर्दी आणि खोकल्याच्या काळात, सिगारेट आणि तंबाखूचे सेवन टाळावे. प्रदूषण टाळण्यासाठी मास्क वापरा.