अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार
शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबतच शांत झोप घेणेसुद्धा आवश्यक आहे. शांत आणि चांगली झोप घेतल्यामुळे आरोग्य, त्वचा आणि केसांच्या आरोग्य निरोगी राहते. नियमित ७ ते ८ तासांची शांत आणि गाढ झोप घेतल्यास संपूर्ण दिवस आनंद, उत्साहामध्ये जातो. दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. विश्रांती घेतल्यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. नियमित शांत झोप घेतल्यामुळे हृदयरोगांचा आणि रक्ताभिसरण रोगांचा धोका कमी होऊन आरोग्य सुधारते. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक रात्रीच्या वेळी उशिरा झोपतात. तर मानसिक तणावामुळे रात्री लवकर झोपच येत नाही. रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठल्यामुळे आरोग्य बिघडते.(फोटो सौजन्य – istock)
धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. मानसिक तणाव वाढल्यानंतर कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. तसेच शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अपुऱ्या झोपेमुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे आजार झाल्यानंतर शरीर कमकुवत होऊन शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो.
मधुमेह हा आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर आजार आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर वारंवार चक्कर येणे, थकवा जाणवणे, शरीरावर जखमा होणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा होते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात लठ्ठपणा वाढू लागतो. शरीराच्या अवयवांवर अनावश्यक चरबी वाढू लागते. तसेच भूक वाढवणारे हार्मोन्स शरीरात वाढतात आणि जास्त खाण्याची इच्छा होते, ज्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो.
झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. अनेक लोक रक्तदाब वाढल्यानंतर दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष केल्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते.
शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. यासोबतच शरीराला कोणत्याही संसर्गजन्य आजारांची लागण लगेच होऊ शकते. तसेच त्वचेच्या समस्या, केसांच्या समस्या, स्मृतिभ्रंश इत्यादी समस्या उद्भवू लागतात.
कमी झोपण्याचे दुष्परिणाम?
कमी झोपल्याने दिवसभर थकवा जाणवतो आणि ऊर्जा कमी लागते.कामात किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.कमी झोपेमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजार होण्याची शक्यता वाढते.
झोपेच्या समस्यांसाठी उपाय?
दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे आरोग्यासाठी चांगले असते. मोबाईल आणि इतर गॅजेट्समधून बाहेर पडणाऱ्या निळ्या रंगाच्या प्रकाशामुळे झोप येण्यास त्रास होतो. दिवसा शारीरिक हालचाली केल्याने रात्री चांगली झोप लागते.