केसांच्या घनदाट वाढीसाठी प्रभावी ठरेल 'या' फळाचा रस
वातावरणातील बदल, धूळ, माती आणि प्रदूषणाचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. अचानक केस तुटणे, केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांमध्ये वाढलेला कोंडा किंवा केस गळणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिलांसह पुरुष सुद्धा बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा केसांच्या समस्या कमी होत नाही. केस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे हानिकारक शँम्पू, कंडिशनर किंवा हेअर सिरम केसांची गुणवत्ता सुधारण्याऐवजी आणखीनच खराब करून टाकतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी रासायनिक प्रॉडक्टचा वापर करू नये. यामुळे केसांच्या समस्या आणखीनच वाढू लागतात.(फोटो सौजन्य – pintrest)
कुत्रा चावल्यानंतर लगेच करा ‘हे’ उपाय, दुर्लक्ष केल्यास रेबिजने होईल तडफडून मृत्यू
केसांच्या मुळांमधील पोषण कमी झाल्यानंतर केसांसंबधित अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे केसांना बाहेरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त गरजेचे आहे. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणत्या लाल फळाच्या रसाचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतील.
केसांच्या वाढीसाठी आवळा अतिशय प्रभावी आहे. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी असल्यामुळे केस अतिशय मजबूत होतात.याशिवाय बीट, काळी मिरी आणि आल्याचा रस मिक्स करून तयार केलेला रस केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी ठरेल.रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बीट, आवळ्याचे तुकडे, आल्याचा बारीक तुकडा आणि काळीमिरी घालून त्यात एक ग्लास पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेला रस गाळून सेवन करावा. या रसाचे उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
आवळा आरोग्यासाठी गुणकारी आहे. आवळ्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. याशिवाय बीटच्या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचा आणि केस अतिशय सुंदर आणि घनदाट होतात. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.