चेहऱ्यावरील ओपन पोर्स आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी गुलाबजल-ग्लिसरीनचा 'या' पद्धतीने करा वापर
चमकदार त्वचेसाठी सर्वच महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारातील महागड्या क्रीम लावल्या जातात तर कधी स्किन केअर करून त्वचेची काळजी घेतली जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र सतत रासायनिक पदार्थांपासून बनवलेल्या महागड्या क्रीमचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक रुक्ष आणि निस्तेज होऊन जाते. वातावरणात सतत होणारे बदल, धूळ, माती किंवा प्रदूषणामुळे त्वचेच्या ओपन घाण जमा होते. ज्यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स किंवा ऍक्ने येतात. तसेच चेहऱ्यावर मोठे मोठे फोड येऊ लागतात. त्वचेवर आलेले फोड घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची जास्त काळजी घ्यावी. कारण वातावरणातील आद्रतेमुळे त्वचा अतिशय तेलकट होऊन जाते. तेलकट त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहरा खराब होऊन जातो.(फोटो सौजन्य – istock)
वातावरणातील बदलांमुळे चेहरा तेलकट होतो? त्वचेवरील तेल कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, त्वचा होईल फ्रेश
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये टोनर म्हणून चेहऱ्यावर गुलाब पाणी लावावे. गुलाब पाणी आणि ग्लिसरीन हे दोन्ही पदार्थ एकत्र मिक्स करून लावल्यामुळे त्वचेमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. याशिवाय त्वचेवर वाढलेले ओपन पोअर्स, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी गुलाब पाणी आणि ग्लिसरीनचा वापर करावा. त्वचेवर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी गुलाब पाणी अतिशय प्रभावी आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाब पाणी आणि ग्लिसरीनचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचा उजळदार होईल.
त्वचेवरील कमी झालेला ग्लो वाढवण्यासाठी वाटीमध्ये एक चमचा ग्लिसरीन घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात कोरफड जेल आणि विटामिन ई कॅप्सूल टाका. तयार केलेले मिश्रण संपूर्ण त्वचेवर आणि मानेवर लावून काहीवेळा तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचेवर चमकदार ग्लो येईल.
ओपन पोअर्स आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी वाटीमध्ये चमचाभर ग्लिसरीन घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून मिक्स करा. नंतर त्यात काकडीचा रस आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि पिगमेंटेशन वाढलेल्या भागावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे त्वचेवर वाढलेला पिगमेंटेशन कमी होईल आणि त्वचा चमकदार दिसेल.