कुत्रा चावल्यानंतर लगेच करा 'हे' उपाय
देशभरात सगळीकडेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. बऱ्याचदा रस्त्याने चालताना किंवा इतर वेळी अनेकांना कुत्रा चावतो. कुत्रा चावल्यानंतर काही लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र कुत्रा चावल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रजेश सोलंकी यांचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतर त्यांना रेबिज सारख्या गंभीर आजाराची लागण झाली. रेबीजमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतामध्ये रेबीजने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बरेच कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या जखमेकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे जीवावर बेतू शकते. कब्बडीपटू ब्रिजेशच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर रेबीजबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.(फोटो सौजन्य – istock)
भारतमध्ये आत्तापर्यंत रेबीजमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रेबीज झाल्यानंतर शरीराची स्थिती अतिशय बिकट होऊन जाते. मागील अनेक वर्षांपासून भटके कुत्रे अनेकांना चावले आहेत. मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी आत्तापर्यंत अनेक मुलांना चावा घेतला आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर तातडीने कोणते उपाय करावे? रेबीज होऊन नये म्हणून काय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रस्त्याने चालताना किंवा इतर वेळी कोणताही कुत्रा चावल्यानंतर लगेच कुत्रा लावलेली जागा स्वच्छ करून घ्यावी. चावलेल्या ठिकाणी अजिबात पाणी लावू नये. त्यानंतर जखम 10 ते 15 मिनिटं अॅंटी-सेप्टिक सोप किंवा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. जखम झालेल्या ठिकाणी अॅंटीसेप्टिक लावून ठेवावे. यामुळे रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होईल. कुत्रा चावलेल्या ठिकाणी पट्टी बांधून रक्तस्त्राव रोखावा. त्यानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
बऱ्याचदा कुत्रा चावल्यानंतर लोक सामान्य समजून दुर्लक्ष करतात. तर काही लोक जखम झालेल्या ठिकाणी हळद, लिंबू किंवा मीठ लावतात. यामुळे जखम बरी होते असे अनेकांना वाटत. यामुळे बॅक्टेरिया मारतील असे अनेकांना वाटते. पण हे सर्व उपाय केल्यामुळे कुत्रा चावलेल्या ठिकाणी जळजळ वाढू लागते. त्यामुळे हे कोणतेही उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करावे.
रेबीज म्हणजे काय?
रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य रोग आहे, जो मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो. संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा ओरबाडल्याने तो माणसांमध्ये पसरतो.
रेबीज कसा पसरतो?
रेबीजचा विषाणू संक्रमित प्राण्यांच्या लाळेतून पसरतो, विशेषतः कुत्रा, मांजर, वटवाघूळ किंवा इतर वन्य प्राण्यांच्या चावल्याने किंवा ओरबाडल्याने.
रेबीजची लक्षणे कोणती?
ताप, डोकेदुखी, थकवा, स्नायू दुखणे, आणि अति लाळ येणे, पाण्याची भीती वाटणे, मानसिक गोंधळ, आणि अर्धांगवायू यांसारखी लक्षणे दिसू शकतात.