Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या ठिकाणी वसलंय दानवीर कर्णाचे एकमेव मंदिर, सूर्यदेवाने इथेच दिली होती कवचकुंडले

Karna Temple : उत्तराखंडातील कर्णप्रयाग हे कर्णाच्या नावाने ओळखले जाणारे पवित्र ठिकाण आहे, जिथे कर्णाने सूर्यदेवाची तपश्चर्या केली होती. अलकनंदा-पिंडर संगमावर वसलेले हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2025 | 09:49 AM
या ठिकाणी वसलंय दानवीर कर्णाचे एकमेव मंदिर, सूर्यदेवाने इथेच दिली होती कवचकुंडले

या ठिकाणी वसलंय दानवीर कर्णाचे एकमेव मंदिर, सूर्यदेवाने इथेच दिली होती कवचकुंडले

Follow Us
Close
Follow Us:

“इतिहास आणि पुराणांमध्ये अनेक शूरवीर आणि दानवीरांचा उल्लेख आढळतो, त्यापैकी “दानवीर कर्ण” हे नाव सर्वात अग्रगण्य आहे. महाभारतातील या महान योद्ध्याने आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही दान करण्याची परंपरा कायम ठेवली. म्हणतात, त्यांनी स्वतःचा कवच-कुंडलच नव्हे, तर आपले सुवर्णदातही दान केले होते.

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग हे पवित्र नगर कर्णाच्या नावाने ओळखले जाते. हे ठिकाण अलकनंदा आणि पिंडर नद्यांच्या संगमावर वसलेले आहे, जिथे प्राचीन कर्ण मंदिर स्थित आहे. स्थानिक मान्यतेनुसार, याच स्थळी सूर्यदेवाने कर्णाला कवच आणि कुंडलाचा वरदान दिला होता. दरवर्षी येथे कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.

येथेच कर्णाने केले सूर्यदेवाची तपश्चर्या

कर्णप्रयागमधील कर्ण मंदिर हे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. असे मानले जाते की कर्णाने याच ठिकाणी बसून सूर्यदेवाची साधना आणि ध्यान केले होते. कुरुक्षेत्राच्या युद्धात कर्णाच्या निधनानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा अंत्यसंस्कार कर्णशिला नावाच्या खडकावर केला होता. हे मंदिर दगडांनी बांधलेले असून पारंपरिक पहाड़ी वास्तुशैलीत उभारलेले आहे. अलकनंदेच्या प्रवाहासोबत येथील शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. हे स्थळ उत्तराखंडच्या पंच प्रयागांपैकी एक आहे.

कर्णप्रयाग भेट देण्यासाठी योग्य काळ

कर्णप्रयाग फिरण्यासाठी एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ सर्वात अनुकूल आहे. या काळात हवामान प्रसन्न आणि निसर्ग अत्यंत सुंदर दिसतो. जुलै-ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने भूस्खलनाचा धोका असतो, त्यामुळे त्या काळात जाणे टाळावे. हिवाळ्यात थंडी जाणवते, पण आकाश स्वच्छ असल्यामुळे ध्यान आणि आत्मिक शांतीसाठी तो काळ योग्य ठरतो.

मंदिरात कसे पोहोचावे

सड़क मार्गाने: कर्णप्रयाग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 58 वर ऋषिकेश आणि बद्रीनाथच्या दरम्यान वसलेले आहे. ऋषिकेशहून देवप्रयाग आणि रुद्रप्रयाग मार्गे सुमारे 172 किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
हवाई मार्गाने: सर्वात जवळचे विमानतळ जॉली ग्रांट (देहरादून) आहे, जे सुमारे 212 किमी दूर आहे.
रेल्वेने: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे, तर मुख्य रेल्वे जोडणी हरिद्वार जंक्शनवरून मिळते.

आसपासची आकर्षक स्थळे

कर्णप्रयाग आणि त्याच्या परिसरात अनेक धार्मिक आणि नैसर्गिक स्थळे पाहायला मिळतात.

  • आदि बद्री मंदिर
  • उमा देवी मंदिर
  • नौटी गाव (सुमारे 25 किमी अंतरावर)
  • चंडिका देवी, सिमली
  • तसेच जवळच नंदप्रयाग देखील प्रसिद्ध आहे.
20,000 रुपयांत पूर्ण होईल राजस्थानची सफर, अशाप्रकारे करा ट्रिपची प्लॅनिंग

येथे नक्की चाखा हे पारंपरिक पदार्थ

  • चैंसू: भाजलेल्या काळ्या चण्यांपासून तयार केलेली रुचकर करी.
  • झंगोऱ्याची खीर: झंगोऱ्यापासून (एक पौष्टिक धान्य) बनवलेली गोड खीर.
  • फाणू: विविध डाळी एकत्र करून बनवलेली दाट आणि पौष्टिक भाजी.
  • आलू के गुटके: मसालेदार तळलेले बटाटे, ज्यासोबत मंडव्याची भाकरी (रागी रोटी) दिली जाते.
  • काफुली: पालक आणि हिरव्या पालेभाज्यांपासून बनवलेली पौष्टिक भाजी, जी “पर्वतीय सुपरफूड” म्हणून ओळखली जाते.
कर्णप्रयाग हे ठिकाण केवळ धार्मिक नाही तर आत्मिक शांती आणि निसर्गसौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठीही आदर्श स्थान आहे. येथे येऊन भक्तांना केवळ कर्णाच्या दानशीलतेचा आदर्शच नव्हे, तर निसर्गाच्या सान्निध्यातील एक दिव्य शांततेचा अनुभवही मिळतो.

Web Title: The only temple of the karna is located in uttarakhand travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • travel news
  • travel tips
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

भारतातील एक असे मंदिर जे सूर्यदेवताला करते नमस्कार, वैज्ञानिकांनाही सुटल नाही हे कोड
1

भारतातील एक असे मंदिर जे सूर्यदेवताला करते नमस्कार, वैज्ञानिकांनाही सुटल नाही हे कोड

पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात ‘या’ ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव
2

पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात ‘या’ ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर
3

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत
4

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.