(फोटो सौजन्य: istock)
“जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल पण बजेट थोडं कमी असेल, तरी काळजीचं काही कारण नाही. भारतातील एक असा राज्य आहे, जिथे तुम्ही फक्त ₹२०,००० रुपयांत शाही महाल, रंगीबेरंगी बाजार, वाळवंटातील ऊंट सफारी आणि तोंडाला पाणी सुटेल असं जेवण याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता आणि ते राज्य म्हणजे राजस्थान!
100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा संगम असलेला राजस्थान प्रत्येक प्रवाशाला मंत्रमुग्ध करतो. थोडीशी योजना आणि समजदारीने तुम्ही ५ ते ६ दिवसांची अप्रतिम राजस्थान ट्रिप फक्त वीस हजार रुपयांत करू शकता. चला तर पाहूया प्रवास कसा करावा, कुठे थांबावं, काय खावं आणि काय बघावं!
किफायतशीर प्रवासाचे पर्याय
दिल्ली ते जयपूर सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे ट्रेन किंवा वोल्वो बस. प्रवासाचा खर्च सुमारे ₹४०० ते ₹६०० इतकाच येतो.
शहरांदरम्यान प्रवास
जयपूरहून जोधपूर आणि नंतर जैसलमेरला जाण्यासाठी रात्रीची ट्रेन किंवा राज्य परिवहन बस उत्तम पर्याय आहे. स्लीपर क्लास तिकिट ₹५००–₹८०० पर्यंत मिळते.
शहरात फिरण्यासाठी स्थानिक ऑटो, शेअर्ड टॅक्सी, किंवा स्कूटर भाड्याने घेणं किफायतशीर ठरतं. जयपूर आणि जोधपूरमध्ये तुम्ही Uber आणि Rapido सारखे अॅप वापरू शकता.
२०,००० रुपयांत राहण्याची सोय
१. जयपूर – गुलाबी शहर
२. जोधपूर – निळं शहर
३. जैसलमेर – सुवर्ण नगरी
काय खावं आणि कुठे खावं
एकूण अंदाजे खर्च (५–६ दिवसांसाठी)
बचतीच्या काही स्मार्ट टिप्स
राजस्थान म्हणजे इतिहास, शौर्य आणि संस्कृतीचं प्रतीक. थोडीशी योजना आणि खर्चाचं नियोजन केल्यास फक्त २०,००० रुपयांतही तुम्ही शाही प्रवासाचा आनंद घेऊ शकता. जयपूरचा राजेशाही ठसा, जोधपूरचं निळं सौंदर्य आणि जैसलमेरचं सुवर्ण वाळवंट, हे तिन्ही अनुभव एकाच ट्रिपमध्ये तुमचं मन जिंकून जातील!