Scientific Reason: दागिने फक्त सौंदर्य वाढविण्यासाठी घातले जात नाही तर शरीराला याचे काही फायदे होतात म्हणून दागिने त्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत. काय सांगते परंपरा
दागिने घालण्यामागील शास्त्रीय कारणं (फोटो सौजन्य - Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
महाराष्ट्रीयन दागिन्यांची परंपरा आणि प्रथा
कशा पद्धतीने बनवले आहेत दागिने
काय आहे इतिहास
Scientific Reason: अगदी लहान मुलीपासून ते आजीच्या वयापर्यंत सर्वांनाच दागिनेघालायला आवडतात. आपल्या महाराष्ट्रीयन दागिन्यांची खरं तर काही वैशिष्ट्य आहेत. ते दागिने असेच बनविण्यात आलेले नाहीत. बुगडी असो, नथ असो, बाजूबंद, चूडा, जोडवी किंवा पैंजण… आपण आजही हे दागिने घालतो कारण त्यामागे केवळ परंपरा नाही, तर अनेक पारंपरिक समजुती आणि अनुभव दडलेले आहेत! प्रत्येक दागिन्यामागचं Scientific Reason आज आपण आपल्या व्हिडिओतून आणि लेखातून समजून घेऊया. आपल्याकडे महाराष्ट्रीयन दागिन्यांचे अनेक प्रकार आहेत आता नक्की त्याची वैशिष्ट्येकाय आहेत आणि कशा पद्धतीने ते परिधान केल्यावर काय फायदे होतात जाणून घ्या
सर्वात पहिले कानातली बुगडी. कानाच्या वरच्या पाळीवर बुगडी हा पारंपरिक दागिना घातला जातो. या बुगडीमुळे Acupressure Point वर सतत हलकासा दाब पडत राहतो. या गोष्टीमुळे मनावरील ताण कमी होण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.
नाकातील नथ. असं म्हटलं जातं की, नाकात नथ घातल्यामुळे त्या भागातील अॅक्युप्रेशर पॉईंट सक्रिय राहतात आणि मायग्रेन व सायनसचा त्रासही कमी होतो.
महिला जेव्हा बाजूबंद घालतात तेव्हा दंडावर हलकासा दाब पडतो आणि शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत मिळते. तसंच पूर्वीच्या काळी हाताची ठेवण डौलदार आणि योग्य राखण्यासाठी बाजूबंद घातला जात असे
हातातील हिरव्या रंगाचा चुडा हा त्वचेशी संपर्क राखतो आणि रक्ताभिसरण योग्य राखले जाते. तसंच हातातील उर्जा चांगली राखली जाते आणि आवाजामुळे सकारात्मकता पसरते
जोडवी ही पायाच्या बोटांमध्ये घातली जाते आणि याची नस ही थेट महिलांच्या गर्भाशयाशी जोडली गेली आहे. जोडवी घातल्याने महिलांचे फर्टिलिटीसंबंधित अवयव हे सुदृढ राहतात आणि मासिक पाळीदेखील नियमित राहण्यास मदत मिळते
पैंजण हा असा दागिना आहे की, तो महिलांनी नियमित घालावा असं सांगण्यात येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील उष्णता चांदी शोषून घेते त्यामुळे याची अधिक मदत होते आणि दुसरं म्हणजे घोट्याजवळ असणारा हा दागिना अॅक्युप्रेशरने पायांचा थकवा घालवण्यास मदत करतो.
आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित
आपल्या पूर्वजांनी आपल्या दागिन्यांकडे फक्त सौंदर्याचा भाग म्हणून नाही तर आरोग्य आणि जीवनशैलीचा एक भाग म्हणून पाहिलं आणि त्यानुसार परिधान केले. आता तुम्हाला दागिने घालण्याची योग्य शास्त्रीय कारणं या लेखातून नक्की कळली असतील ना? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.