दिवाळी सणाच्या दिवशी सर्वच महिला छान नटून थटून तयार होतात. सुंदर साडी, मॅचिंग दागिने, हलकासा मेकअप करून महिला सणाच्या दिवशी छान तयारी करतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळी सुंदर दिसण्यासाठी या पद्धतीचे दागिने तुम्ही परिधान करू शकता. हे दागिने घातल्यानंतर तुमचा लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसेल.
दिवाळीमध्ये परिधान करा 'या' पद्धतीचे सुंदर दागिने

साडी नेसल्यानंतर पहिली पसंती मोत्यांचे दागिने परिधान करण्यास दिली जाते. मोत्याचे दागिने सर्व प्रकारच्या साडीवर उठून दिसतात. मोत्याच्या दागिन्यांमध्ये तुम्ही चिंचपेटी, तन्मणी, कानातले, बाजूबंद इत्यादी दागिने परिधान करू शकता.

पूर्वीच्या काळी परिधान केला जाणारा पुतळी हार हल्ली ट्रेंडिंगला आला आहे. हा हार घातल्यानंतर लुक थोडा पारंपरिक आणि मॉर्डन दिसतो.

पारंपरिक दागिना म्हणून ओळख असलेला कोल्हापुरी साज सर्वच महिलांना खूप आवडतो. हा दागिना गळ्यात घातल्यानंतर गळा खूप जास्त भरलेला आणि सुंदर दिसतो. पैठणी साडीवर कोल्हापुरी साज तुम्ही परिधान करू शकता.

इमिटेड ज्वेलरी कोणत्याही रंगाच्या साडीवर खूप सुंदर दिसते. या दागिन्यांचा एक सेट घातल्यानंतर इतर कोणताही दागिना घालण्याची आवश्यकता नाही.

कुंदन आणि त्यावर मोती किंवा रुबी असलेले दागिने थोड्या फॅन्सी किंवा डीझायनर साड्यांवर छान दिसतात. या दागिन्यांना बाजारात मोठी मागणी आहे.



