Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 25.09.2026
Maharashtra to World Breaking News : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाची सांगता; लालबागच्या राजासह मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका उत्तररात्रीपर्यंत उत्साहात सुरूवात झाली आहे. रेल्वे बोर्डाकडून महाराष्ट्रासाठी नवीन ‘पुणे-बीड एक्सप्रेस’सह मध्य प्रदेश व गुजरातसाठी विशेष गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
२८ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित तीन दिवसीय बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन २५ सप्टेंबरलाच जमा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
हैदराबाद आणि तेलंगणातील प्रमुख शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी शाळा-कॉलेजांना अधिकृत सुट्टी घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दुष्काळाच्या परिस्थितीची आढावा अधिसूचना जारी करण्यात आली असून मदत प्रक्रियेला गती देण्याचे प्रशासनाचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत.
25 Sep 2026 09:20 AM (IST)
Gyanesh Kumar Kolhapur Bench Bombay High Court: देशभरात भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) कारभारावरून आणि पारदर्शकतेवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Chief Election Commissioner Gyanesh Kumar) यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने घेतलेले काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना थेट कायदेशीर आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात (Kolhapur Bench) दाखल करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या दृष्टीने ही याचिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे
25 Sep 2026 09:12 AM (IST)
SBI Cash Withdrawal Rules: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या 'भारतीय स्टेट बँकेने' (SBI) आपल्या ग्राहकांसाठी सेवा शुल्कात मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून रोख रक्कम (Cash) काढण्याच्या नियमांमध्ये हे सुधारित दर लागू केले जाणार आहेत. ठरवून दिलेल्या मोफत मर्यादेपेक्षा (Free Limit) जास्त वेळा रोख रक्कम काढल्यास ग्राहकांना आता प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार आहे.
बँकेने स्पष्ट केले आहे की, हा नियम नेहमीच्या सामान्य बचत खात्यांना लागू नसून केवळ शाखांद्वारे उघडण्यात आलेल्या बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांसाठी लागू करण्यात आला आहे.
25 Sep 2026 09:06 AM (IST)
Maharashtra Student Union Elections : महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्राबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या आवारात विद्यार्थी निवडणुका (Student Union Elections) पुन्हा एकदा सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अतिशय वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुका कशा आणि कोणत्या पद्धतीने पार पाडता येतील, याचा सविस्तर अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी १२ सदस्यांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
25 Sep 2026 09:00 AM (IST)
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पुणे शहरात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना एका व्यापार्यावर भरदिवसा कोयत्याने वार करुन त्यांच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत व्यापारी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
25 Sep 2026 08:52 AM (IST)
आपल्या भारतीयांना रेल्वेने प्रवास करताना भरपूर सामान घेऊन जाण्याची सवय आहे. तथापि, तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेतून सामान वाहून नेताना रेल्वेच्या काही नियमांचे पालन करावे लागते. सामानासाठी रेल्वेकडून एक लिमिट निश्चित करण्यात आली आहे. या लिमिटच्या आधारावरच तुम्ही तुमच्या गरजेचे सामान प्रवासात घेऊन जाऊ शकता - वाचा सविस्तर
25 Sep 2026 08:50 AM (IST)
नवी दिल्ली : देशभरातील अनेक राज्यांत वातावरणात बदल जाणवत आहे. महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील नागरिकांना पावसाची अद्याप प्रतिक्षाच आहे. असे असताना आता उत्तर प्रदेशातील हवामान बदलले आहे. उत्तर प्रदेशात आता शुक्रवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १३ जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २९ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ५२ जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत, प्रयागराजमध्ये २६ मिमी, सुलतानपूरमध्ये २०.८ मिमी, अमेठीमध्ये १९.८ मिमी आणि गोरखपूरमध्ये १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. बाराबंकी, अयोध्या, गाझीपूर, बलिया, सोनभद्र आणि महाराजगंज येथेही पाऊस झाला.






