Pooja Birari Gauri Avahan 2026: गौरी आगमनाच्या निमित्ताने पूजा बिरारी यांनी खास मराठमोळ्या पारंपरिक लुकमध्ये फोटो शेअर केले आहेत. निळ्या रंगाची सुंदर साडी, नाजूक दागिने, साधी हेअरस्टाईल आणि हलका मेकअप यामुळे त्यांचा सोज्वळ अंदाज खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मंगळसूत्राच्या आकर्षक डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Pooja Birari: पूजा बिरारींचा मराठमोळा साज खुलला; (फोटो सौजन्य- AI)

गौरी आगमनाचा दिवस महाराष्ट्रात खूप महत्वाचा असतो. पूजा बिरारीने पण या दिवसासाठी खास तयारी केली आहे. निळ्या रंगाची साधी पण सुंदर साडी नेसून ती गौरीच्या स्वागतासाठी सजली आहे. फोटो सौजन्य - @Adesh VishwaSlide

पूजाने जी साडी नेसली आहे ती एकदम पारंपरिक आहे. साडी नेसण्याची पद्धत पण अगदी मराठमोळी. चेहऱ्यावर हसू आणि प्रसन्न भाव असल्यामुळे तिचा लुक अजून खुलून दिसतोय. सणाला असंच साधं पण सुंदर दिसावं.

या लुकमध्ये सगळ्यात जास्त लक्ष जातंय ते तिच्या मंगळसूत्राकडे. तिने घातलेलं मंगळसूत्र एकदम वेगळ्या डिझाईनचं आहे. पारंपरिक पण नाजूक. साडीवर ते एकदम उठून दिसतंय. लोक तिच्या मंगळसूत्राच्या डिझाईनबद्दलच जास्त बोलत आहेत.

पूजाने जड दागिने घातले नाहीत. कानात छोटे दागिने आणि गळ्यात फक्त मंगळसूत्र. एवढ्यावरच तिने आपला लुक पूर्ण केला आहे. सणाच्या दिवशी जास्त दागिने न घालता असं नाजूक काहीतरी घातलं की जास्त सुंदर दिसतं, हे तिने दाखवून दिलं.

केसांची स्टाईल पण तिने अगदी साधी ठेवली आहे. साडीला शोभेल अशी. आणि मेकअप तर अगदी हलका. फार काही लावलेलं नाही. त्यामुळे तिचं नैसर्गिक सौंदर्य अजून जास्त दिसतंय. प्रत्येक गोष्ट एकमेकांना मॅच होतेय.

तिच्या या पूर्ण लुकमध्ये मराठी संस्कृती दिसते. साडीपासून ते दागिन्यांपर्यंत सगळं कसं मराठमोळं वाटतंय. आजकालच्या फॅशनच्या जमान्यात असा पारंपरिक लुक बघायला लोकांना खूप आवडतो.

पूजाचे हे फोटो सोशल मीडियावर आल्यापासून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सगळ्यांना तिचा हा साधा आणि सोज्वळ लुक खूप आवडला आहे. भडकपणा न करता पण सुंदर कसं दिसायचं याचं उदाहरणच आहे हा.

आदेश बांदेकरांचं कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. त्यांच्या घरचे सण पण मोठ्या उत्साहात होतात. यंदा गौरी आगमनासाठी पूजाने केलेली ही तयारी बघून घरात किती उत्साह असेल याचा अंदाज येतो. तिचे हे फोटो बघून तुम्हाला पण गौरीच्या सणाची आठवण येईल.






