Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inflation In India : भारतातील ‘या’ 10 राज्यांमध्ये बेरोजगारांची संख्या सर्वाधिक; आकडे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

Unemployment In India : भारतातील अनेक राज्यांमधील बेरोजगारीचा दर धक्कादायक आहे. PLFSच्या अहवालानुसार, लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुणांची संख्या ३६.२% आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 21, 2025 | 03:47 PM
These 10 states in India have the highest number of unemployed people

These 10 states in India have the highest number of unemployed people

Follow Us
Follow Us:

Unemployment In India : भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. तंत्रज्ञान, उद्योग, सेवा, शिक्षण आणि शेतीसह विविध क्षेत्रात देश झपाट्याने प्रगती करत आहे. तरीसुद्धा, या प्रगतीच्या शर्यतीत एक मोठा प्रश्न आजही डोके वर काढतोय तो म्हणजे तरुणांची बेरोजगारी. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कामगार ब्युरोच्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS) अहवालानुसार, भारतातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांचा बेरोजगारी दर धक्कादायक पातळीवर पोहोचला आहे.

सर्वात धक्कादायक आकडा लक्षद्वीप या छोट्याशा द्वीपसमूहात नोंदवला गेला. येथे जवळपास ३६.२ टक्के तरुण बेरोजगार आहेत. एवढेच नव्हे, तर महिलांमध्ये हा दर तब्बल ७९.७ टक्के इतका आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक दहा मुलींमधील आठ जणींना रोजगार नाही. हा आकडा चिंतेचा आणि खळबळजनक आहे.

बेरोजगारीचा उच्चांक गाठलेली राज्ये

अहवालानुसार, देशभरातील २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तरुणांचा बेरोजगारी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी सर्वात गंभीर परिस्थिती असलेली शीर्ष १० राज्ये पुढीलप्रमाणे –

  • लक्षद्वीप – ३६.२% (महिला: ७९.७%, पुरुष: २६.२%)
  • अंदमान-निकोबार बेटे – ३३.६% (महिला: ४९.५%, पुरुष: २४%)
  • केरळ – २९.९% (महिला: ४७.१%, पुरुष: १९.३%)
  • नागालंड – २७.४%
  • मणिपूर – २२.९%
  • लडाख – २२.२%
  • अरुणाचल प्रदेश – २०.९%
  • गोवा – १९.१%
  • पंजाब – १८.८%
  • आंध्र प्रदेश – १७.५%

हे आकडे स्पष्ट दाखवतात की किनारपट्टीवरील व ईशान्येकडील राज्यांमध्ये रोजगाराचा तुटवडा अधिक आहे. पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि छोट्या उद्योगांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था तरुणांना दीर्घकालीन स्थिर नोकऱ्या देण्यात अपयशी ठरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव

सर्वात कमी बेरोजगारी असलेली राज्ये

दुसऱ्या बाजूला काही राज्यांनी बेरोजगारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. मध्य प्रदेश या यादीत तळाशी असून येथे बेरोजगारीचा दर केवळ २.६% आहे. त्याचबरोबर गुजरात (३.१%), झारखंड (३.६%) आणि दिल्ली (४.६%) याठिकाणीही परिस्थिती तुलनेने स्थिर आहे. काही राज्यांनी औद्योगिक गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि कृषीआधारित उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

पुरुष-स्त्रिया आणि शहर-गाव यांचे चित्र

अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. देशभरातील महिला बेरोजगारी दर (११%) हा पुरुषांपेक्षा (९.८%) अधिक आहे. म्हणजेच महिलांना नोकरीच्या संधी अजूनही कमी प्रमाणात मिळत आहेत. तसेच शहरी भागात बेरोजगारीचा दर १४.७% इतका आहे, तर ग्रामीण भागात तो ८.५% आहे. शहरांमध्ये उच्च शिक्षित तरुणांची संख्या जास्त असली, तरी तिथे योग्य नोकऱ्यांची कमतरता भासते. ग्रामीण भागात शेती आणि पारंपरिक व्यवसायांमुळे काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.

बेरोजगारीचे परिणाम आणि उपाययोजना

तरुण बेरोजगारांची ही वाढती संख्या केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही धोकादायक ठरू शकते. बेरोजगारीमुळे स्थलांतर, आर्थिक विषमता, मानसिक ताणतणाव आणि सामाजिक अस्थिरता वाढण्याचा धोका असतो.

तज्ञांच्या मते, यावर उपाय म्हणून –

  • कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणे,
  • लघुउद्योग व स्टार्टअप्ससाठी भांडवल उपलब्ध करून देणे,
  • पर्यटन, आयटी, हरित ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे,
  • तसेच महिलांसाठी रोजगार संधी वाढवणे गरजेचे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे

तरुणाई हीच खरी ताकद

भारत हा तरुणांचा देश आहे. लोकसंख्येच्या ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. हीच आपली खरी ताकद आहे. परंतु या तरुणांना रोजगार नसेल, तर देशाची प्रगतीही अपूर्ण राहील. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार, उद्योगक्षेत्र आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर समन्वयाची गरज आहे.

Web Title: These 10 states in india have the highest number of unemployed people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Andaman and Nicobar Islands
  • Haryana
  • jammu kashmir
  • Manipur

संबंधित बातम्या

हरियाणा कर्जबाजारी; व्याज फेडण्यासाठीही सरकारला घ्यावे लागले नवे कर्ज
1

हरियाणा कर्जबाजारी; व्याज फेडण्यासाठीही सरकारला घ्यावे लागले नवे कर्ज

Lashkar Commander Yasir  Encounter: ‘ऑपरेशन अशदार’ला यश; लश्करचा कमांडर यासिरचा चकमकीत खात्मा
2

Lashkar Commander Yasir Encounter: ‘ऑपरेशन अशदार’ला यश; लश्करचा कमांडर यासिरचा चकमकीत खात्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.