Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयात Breast Cancer होण्यास कारणीभूत ठरतात ‘ही’ गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

स्तनामध्ये वेदनादायी गाठी जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेऊन योग्य ते निदान करावे, अन्यथा कॅन्सरच्या पेशी स्तनात पसरू लागतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 05:30 AM
तरुण वयात Breast cancer होण्यास कारणीभूत ठरतात 'ही' गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

तरुण वयात Breast cancer होण्यास कारणीभूत ठरतात 'ही' गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

Follow Us
Close
Follow Us:

स्तनाचा कॅन्सर होण्याची कारणे?
स्तनाच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे?
कॅन्सर होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. याशिवाय गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर पायांखाली जमीन सरकल्यासारखे वाटते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ते उपचार करावेत, अन्यथा संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यातील अतिशय गंभीर कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर. वयस्कर महिलांमध्येच नाहीतर तरुण वयातील मुलींनासुद्धा स्तनाच्या कॅन्सरची लागण होते. जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मातृत्व, ताणतणाव, लठ्ठपणा आणि अनुवांशिक कारणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. स्तनात गाठ, त्वचेत बदल, निप्पलमधून स्त्राव किंवा वेदना यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास वेळीच योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.(फोटो सौजन्य – istock)

खवळलेलं पित्त कायमचे होईल शांत! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी, मिळेल आराम

शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसू लागतात. मात्र कालांतराने लक्षणांकडे वाढ होते आणि शरीरात प्रचंड थकवा, अशक्तपणा वाढून वजन झपाट्याने कमी होते. कॅन्सरच्या अनियंत्रित पेशींच्या परिणामामुळे आरोग्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तरुण वयात स्तनाच्या कॅन्सरची लागण का होते? स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे? याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय आणि कशामुळे होतो?

स्तनाचा कॅन्सर स्तनाच्या पेशींच्या डीएनएमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होतो, ज्यामुळे पेशी मरण्याऐवजी वेगाने वाढत जातात. त्यानंतर त्यांची गाठ तयार होते. स्तनाचा कॅन्सर प्रामुख्याने दूध तयार करणाऱ्या ग्रंथींमध्ये किंवा दुग्धवाहिन्यांमध्ये तयार होतो. स्तनामध्ये आलेली गाठ वेळीच न काढल्यास संपूर्ण स्तनांमध्ये कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी पसरू लागतात. याशिवाय तरुण वयात होणारा कॅन्सर शरीरात वेगाने हानिकारक पेशी तयार करतो, ज्यामुळे शरीरातील पेशी विभाजनाचा वेग वाढतो.

तरुण वयात स्तनाचा कॅन्सर होण्याची कारणे?

जीवनशैलीत सातत्याने होणारा बदल गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरतो. तसेच वयाच्या ३० व्या वर्षानंतर मुलांना जन्म देणे किंवा स्तनपान न केल्यामुळे शरीराचे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. अतिप्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड्स, साखर आणि ‘ट्रान्स फॅट किंवा लाल मांस अति प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी झपाट्याने वाढू लागतात. शरीरातील अतिरिक्त चरबी कर्करोगाला पोषक ठरणारे हार्मोन्स तयार करते. ज्याच्या परिणामामुळे भविष्यात शरीरात कोणत्याही अवयवात कॅन्सरच्या गाठी तयार होतात. प्लास्टिकचा अतिवापर, प्रदुषण आणि केमिकल युक्त स्किन केअरचा वापर केल्यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते.

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे:

स्तनात किंवा काखेत नवीन गाठ जाणवणे
स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात अचानक बदल होणे.
स्तनाची त्वचा लाल होणे
स्तन खरखरीत होणे किंवा तिथे खड्डा पडणे.
निप्पलमधून रक्त किंवा पांढरा द्रव येणे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे काय आहेत?

    Ans: स्तनात किंवा काखेत वेदनाहीन, कडक आणि अनियमित आकाराची गाठ

  • Que: ब्रेस्ट कॅन्सरची प्रमुख कारणे काय आहेत?

    Ans: अनुवांशिक बदल, संप्रेरकांमधील (hormones) असंतुलन, वाढते वय आणि जीवनशैलीमुळे होऊ शकते.

  • Que: गाठ म्हणजे कॅन्सर आहे का?

    Ans: नाही, स्तनातील सर्व गाठी कॅन्सर नसतात. तरीही, कोणताही बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी (विशेषतः सर्जन) संपर्क साधावा.

Web Title: These are serious reasons that cause breast cancer at a young age change the diet to prevent lumps in the breast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • Breast Cancer news
  • Cancer prevention

संबंधित बातम्या

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता
1

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.