
फोटो सौजन्य सोशल मिडिया
एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२०० हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९०० हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या लक्ष देण्याजोग्या गाठी आढळल्या असून त्यांना पुढील वैद्यकीय मूल्यमापनासाठी आणि उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील यशानंतर, आता दुसऱ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४४ आयब्रेस्टएक्झाम डिवाईसेस तैनात करण्यात आली आहेत, ज्याद्वारे राज्यातील ४.४ लाख अतिरिक्त महिलांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा मानस आहे.
आयब्रेस्टएक्झाम हे बॅटरीवर चालणारे, वेदनारहित आणि रॅडिएशन-मुक्त पोर्टेबल डिवाईस असून ते पेशींमधील असामान्य कडकपणा ओळखण्याचे काम करते. हे तंत्रज्ञान क्लिनिक्स, आरोग्य शिबिरे आणि थेट समुदाय स्तरावर सहजरीत्या वापरता येते.
या उपक्रमाबाबत बोलताना *युई लाइफसायन्सेसच्या भारतातील सीईओ श्रीमती गौरी नवलकर-गोडसे* म्हणाल्या, “सुरुवातीच्या टप्प्यात निदान होण्यासाठी स्तनाच्या आरोग्याची तपासणी अधिक सहज उपलब्ध करणे आणि महिलांना वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रगतीवरून ही सुविधा थेट समुदायांपर्यंत पोहोचवण्याचे आणि असामान्य गाठ आढळल्यापासून ते वैद्यकीय मूल्यांकनापर्यंतचा मार्ग सुलभ करण्याचे महत्त्व स्पष्ट होते. जनजागृती, सुलभ उपलब्धता आणि पाठपुरावा यावर सातत्यपूर्ण काम करणे गरजेचे आहे.”
पीडी हिंदुजा हॉस्पिटलच्या जनरल आणि इंटरनल मेडिसिन फिजिशियन डॉ. मोनिका गोयल यांनी सांगितले, “स्तनाच्या नियमित तपासणीची सुविधा नसलेल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी समुदाय-आधारित तपासणी महत्त्वाची भूमिका बजावते. गाठ ओळखणे हे महत्त्वाचे पहिले पाऊल असून त्यानंतर वेळेवर फॉलो-अप आणि योग्य वैद्यकीय मूल्यमापन होणे तितकेच आवश्यक आहे. हे उपक्रम वंचित घटकांमध्ये जनजागृती वाढवण्यास आणि महिलांना आरोग्यदायी पावले उचलण्यास प्रेरित करतात.”
सुलभ तपासणी, जनजागृती, वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि योग्य पाठपुरावा यांची सांगड घालून स्तनाच्या कर्करोगाविरुद्धचा लढा अधिक सक्षम करण्यासाठी हे उपक्रम अत्यंत मोलाचे ठरत आहेत.
Ans: वेदनारहित आणि रेडिएशन-मुक्त पोर्टेबल उपकरण आहे. ते स्तनातील पेशींमधील असामान्य कडकपणा ओळखण्यास मदत करते
Ans: १२ महिन्यांत १,०१,२०० हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली.
Ans: स्तनात नवीन गाठ, आकारात बदल, त्वचेत बदल किंवा स्तनाग्रातून असामान्य स्राव दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.