(फोटो सौजन्य: Pinterest)
इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये, एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथील प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी काही फायबरयुक्त पदार्थांबद्दल सांगितले आहे ज्यांचे नियमितपणे सेवन केल्याने आरामात सकाळी पोट साफ होत जाईल आणि डाॅक्टरांकडे जाण्याची गरजही भासणार नाही. तुम्हालाही पोटाच्या समस्यांना सारख्या भेडसावत असतील तर आजपासूनच आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करायला सुरुवात करा.
हलकी हिरवी केळी
बाजारात नेहमी पिवळ्या रंगांची केळी दिसून येतात आणि तिच खाल्ली जातात. पण यावेळी जर तुम्हाला बाजारात कधी हलक्या हिरव्या रंगांची केळी दिसली तर आवर्जून त्यांना खरेदी करा. याचे सेवन आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देते आणि रक्तातील साखर स्थिर करते, परिणामी यामुळे पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते. डॉ. सेठी दररोज किमान एक तरी हलक्या हिरव्या केळीचे सेवन करण्याची शिफारस करतात.
चिया सिड्स
चिया सिड्स पाण्यात टाकून मग त्याचे सेवन केले जाते. तुम्ही कोणत्या ड्रिंकमध्येही टाकून याचे सेवन करु शकता. याचे सेवन पोट भरल्याची भावना वाढवते आणि आतड्यांची नियमित हालचाल राखण्यास मदत करते. डॉक्टर दररोज १-२ चमचे चिया बिया दही किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाण्याची शिफारस करतात.
डाळी
डाळींचे सेवन फक्त आपल्या आरोग्यावर परिणाम घडवून आणत आहे तर याचा आपल्या पचनसंस्थेवरही परिणाम होत असतो. डाळींमध्ये फायबर, प्लांट बेस प्रोटीन आणि काही आवश्यक घटक असतात जे पोटाच्या आरोग्यावर चांगला परिणाम करतात. डॉ. सेठी आठवड्यातील बहुतेक दिवस १/२ ते १ कप शिजवलेल्या डाळी किंवा शेंगा खाण्याचा सल्ला देतात.
बेरीज
लहानांपासून मोठ्यांना बेरीज खायला फार आवडतात. या फळाचे सेवन फक्त तोंडाचे चोचलेच पुरवत नाही तर आतड्यांच्या आरोग्यासही प्रोत्साहन देते. ब्लूबेरीज किंवा रास्पबेरीज, फायबर आणि पॉलीफेनॉल्सचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत. डॉ. सेठी यांनी दररोज १/२ ते १ कप बेरीज खाण्याचा सल्ला दिला आहे.
Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे
नट्स
अक्रोड आणि बदाम सारख्या नट्समध्ये फायबर आणि हेल्थी फॅट भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे पोट भरल्याची भावना, चयापचय आरोग्य आणि चांगल्या आतड्यांतील सूक्ष्मजंतूंची विविधता वाढते. डॉ. सेठी दररोज सुमारे १/४ कप नट्स खाण्याची शिफारस करतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






