स्वयंपाक घरातील 'हे' बारीक दाणे त्वचा करतील काचेसारखी सुंदर
वय वाढल्यानंतर सर्वच महिलांना त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. पिंपल्स, पिगमेंटेशन, मुरूम किंवा त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवते. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. बोटॉक्स, फेशियल, बीच इत्यादी महागड्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. तर काही महिला स्किन केअर रुटीनमध्ये वारंवार बदल केला जातो. पण सतत स्किन केअर रुटीनमध्ये बदललं केल्यामुळे त्वचेवर मुरूम आणि पिंपल्स येण्याची शक्यता असते. वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आरोग्यासोबतच त्वचा देखील खराब आणि निस्तेज होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावरील कमी झालेले तेज पुन्हा परत मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र हे उपाय केल्यामुळे काही काळापुरतीच त्वचा सुंदर आणि उठावदार दिसते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारातील कोणत्याही हानिकारक प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी आहारात बदल करणे, घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो टिकून राहतो आणि त्वचा कायमच फ्रेश दिसते. आयुर्वेदिक घटकांच्या वापरामुळे त्वचा कायमच सुंदर राहते. आज आम्ही तुम्हाला त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या पदार्थाचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
प्रत्येक स्वयंपाक घरात खसखस उपलब्ध असते. जेवणातील पदार्थ बनवताना खसखस वापरले जाते. आरोग्यासाठी हे बारीक दाणे अतिशय प्रभावी आहेत. त्वचेसंबंधित वाढलेल्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. चेहऱ्यावर वाढलेले पिग्मेंटेशन आणि डाग कमी करण्यासाठी खसखस वापरावे. उन्हामुळे वाढलेले टॅनिंग, डेड स्किन, रुक्ष त्वचा सुधारण्यासाठी खसखस वापरावे. खसखसमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर वाढलेल्या मृत पेशी कमी करण्यासाठी मदत करते. उन्हामुळे त्वचा लाल होऊन जाते, अशावेळी खसखस वापरून त्वचेवर उष्णता कमी करावी.
फेसपॅक तयार करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजवलेली खसखस मिक्सरमधून बारीक करून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून मॅश केलेले केळे, कोरफड जेल आणि मध घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक त्वचेवर लावून ठेवा. १० मिनिटांनी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लावल्यास त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर होईल.