तरुण वयात त्वचेवर सुरकुत्या आल्या आहेत? लिंबू पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ
काचेसारख्या चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल केले जाते, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. मात्र या सगळ्यामुळे काहीकाळच त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार राहते. पण काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होते. वय वाढल्यानंतर घरातील आजी आणि आई अधिक तरुण आणि सुंदर दिसतात. मात्र वयाच्या २० मध्येच काहींची त्वचा अतिशय निस्तेज होऊन जाते. वयाच्या २० शीमध्ये चमकदार ग्लो मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जाते. स्किन केअर प्रॉडक्ट, डाएट प्लॅन किंवा इतरही अनेक गोष्टींमध्ये बदल केला जातो. मात्र हे उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
सर्वच महिलांना गोरापान आणि चमकदार चेहरा हवा असतो. मात्र वातावरणातील बदल, धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा अधिकच तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि फोड कालांतराने कमी होतात, मात्र त्यांचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमकदार, गोऱ्यापान त्वचेसाठी लिंबू पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेवर ग्लो वाढतो.
त्वचा निरोगी, चमकदार ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. पोटात साचलेले विषारी घटक शरीरात उष्णता तयार करतात, ज्यामुळे त्वचेवर फोड येणे, पिंपल्स येणे किंवा इतरही समस्या उद्भवतात. पोषक तत्वांनी समृद्ध असलेले ड्रिंक प्यायल्यास त्वचेवर ग्लो वाढतो.
सकाळी उठताच 1-2 बाटली पाणी घशाखाली उतरवणे किडनीसाठी होईल धोकादायक, परिणाम वाचून डोळेच फिरतील
हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मनुका, केशर, चिया सीड्स आणि लिंबूचा वापर करावा. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा चिया सीड्स, मनुके आणि केशर काड्या घालून मिक्स करा. काहीवेळ ठेवल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले ड्रिंक सकाळी उठल्यानंतर नियमित प्यायल्यास त्वचेवर ग्लो वाढेल. त्वचा आतून सुधरण्यास मदत होईल. शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.