आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे?
कॅन्सर होण्यास कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात?
कॅन्सर होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खावेत?
जगभरात आतड्यांच्या कॅन्सरने अनेक लोक त्रस्त आहेत. कॅन्सर हा अतिशय घातक आणि गंभीर आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे उदभवस्त होऊन जाते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आतड्यांचा कॅन्सर होण्यामागे जीवनशैलीतील सवयी कारणीभूत ठरतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, वारंवार अपचन, अतिप्रक्रिया केलेले अन्न आणि प्रदूषणाचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय लाल मासांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर मोठ्या आतड्याच्या आतील अस्तरावर पेशींचा एक छोटा समूह वाढू लागतो. यामुळे सुरुवातीच्या काळात अपचनाच्या समस्या उद्भवतात. मात्र कालांतराने या समस्या आणखीनच वाढून शरीरासाठी जीवघेण्या ठरतात. जाणून घ्या आतड्यांच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे.(फोटो सौजन्य – istock)
जीवघेण्या आजारांची लागण होण्यास वयाचे बंधन अजिबात राहिलेले नाही. मागील काही वर्षांमध्ये ५० पेक्षा कमी व्यायोगटातील लोकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बदललेली जीवनशैली आणि आहारात फायबरची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जंक फूड, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन करतात. वारंवार मैदा असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढण्यासोबतच अपचनाच्या समस्या सुद्धा वाढू लागतात. त्यामुळे तरुण पिढी गंभीर आजारांच्या जाळ्यात अडकून पडली आहे.
मोठ्या आतड्यांचा कॅन्सर होण्यामागे अनुवांशिकता कारणीभूत ठरते. ‘लिंच सिंड्रोम’ किंवा ‘गार्डनर्स सिंड्रोम’ यांसारख्या बदलांमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. हे आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. कुटुंबात कोणालाही कोलन कॅन्सरचा इतिहास असेल तर कमी वयात गंभीर आजारांची तपासणी करणे आवश्यक आहे.
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लागण होऊ नये म्हणून आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळ भाज्यांचे सेवन करावे. यासोबतच शरीरास सहज पचन होतील असेच पदार्थ खावेत. आहारात कोंडा न काढलेली पिठे, पॉलिश न केलेला तांदूळ, भरपूर सलाड आणि पालेभाज्यांचा समावेश केल्यास तुम्ही कायमच निरोगी राहाल. आहारात तेलकट आणि अतितिखट पदार्थ अजिबात खाऊ नये.
Ans: कर्करोग मोठ्या आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या पेशींमध्ये सुरू होतो.
Ans: अचानक वजन घटणे. शरीरात कुठेही नवीन गाठ किंवा जखम होणे, जी बरी होत नाही.
Ans: धूम्रपान आणि मद्यपान कर्करोगाचे मोठे कारण आहे.






