छातीत साचून राहिलेला कफ होईल मोकळा! नियमित चघळून खा 'हा' आयुर्वेदिक पदार्थ
हिवाळ्यात सर्दी खोकला का होतो?
जेष्ठमध खाण्याचे फायदे?
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय?
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हिवाळ्यात साथीचे आजार झपाट्याने पसरू लागतात. या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय नाजूक होऊन जाते. सतत सर्दी, खोकला झाल्यामुळे छातीत कफ जमा होण्यास सुरुवात होते. छातीत जमा झालेला कफ कालांतराने घट्ट झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. हिवाळ्यात थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच शरीरास सहज पचन होणाऱ्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. सर्दी खोकला झाल्यानंतर मेडिकलमधील कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करून आराम मिळवावा. आयुर्वेदिक उपाय केल्यामुळे छातीत जमा झालेला कोरडा कफ पातळ होऊन शरीरातून बाहेर पडून जातो. जाणून घ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी काय खावे.(फोटो सौजन्य – istock)
जेष्ठमध हे प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे. यामुळे छातीत जमा झालेला कोरडा कफ बाहेर पडून जातो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्येष्ठमधातील गोडवा घशात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. याशिवाय खोकल्यामुळे फुफ्फुसांची बिघडलेली क्षमता सुधारण्यासाठी जेष्ठमध खावे. जेष्ठमधाची एक बारीक काडी नियमित चघळत राहिल्यास छातीत जमा झालेला कफ बाहेर पडून जाईल आणि शरीराला भरमसाट फायदे होतील. छातीत घट्ट झालेला कफ बाहेर पडून जाणे कठीण होऊन जाते. अशावेळी ज्येष्ठमधाची छोटी काडी चघळल्यामुळे त्यातील औषधी अर्क थेट शरीरात जातो आणि नैसर्गिक प्रक्रियेद्वारे कफ बाहेर पडून जाण्यास मदत होते.
जेष्ठमधामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे छातीत जमा झालेला कोरडा कफ बाहेर पडून जाण्यास मदत होते. यामध्ये विषाणू आणि जीवाणूंशी लढण्याची क्षमता असते. थंडीच्या दिवसांमध्ये वाढलेले आजार कमी करण्यासाठी जेष्ठमध अतिशय प्रभावी मानले जाते. घशात वाढलेला कोरडेपणा आणि जळजळ कमी करण्यासाठी जेष्ठमध खावे.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन केल्यास घशात वाढलेली खवखव कमी होण्यासोबतच कफ सुद्धा पातळ होईल. कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा बारीक तुकडा साखर किंवा गुळासोबत चावून खावा. यामुळे तात्काळ फरक दिसून येईल आणि शरीरालासुद्धा अनेक फायदे होतील. आल्याचा रस प्यायल्यामुळे फुफ्फुस स्वच्छ राहतात.
Ans: सर्दी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो प्रामुख्याने 'राइनोव्हायरस'मुळे होतो.
Ans: थंड आणि कोरड्या हवामानामुळे नाकातील आणि घशातील श्लेष्मल त्वचा कोरडी पडते, ज्यामुळे विषाणूंचा संसर्ग सोपा होतो.
Ans: हा कामाच्या ठिकाणी थंडीच्या वातावरणात काम करणाऱ्यांसाठी एक आरोग्यविषयक धोका आहे, ज्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.






