
आजीबाईच्या बटव्यातील 'हे' घरगुती उपाय डोळ्यांसह चेहऱ्यावर आणतील ग्लो
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. कधी आहारात होणारे बदल, तर कधी अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच डोळ्यांसह त्वचेची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झोपेची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, कामाचा वाढलेला तणाव, सतत मोबाइल-लॅपटॉपचा वापर आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. डोळ्यांभोवती आलेले काळे डाग संपूर्ण त्वचेचे सौंदर्य खराब करून टाकतात. डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी महागड्या क्रीम तर कधी वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेऊन डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवतात.(फोटो सौजन्य – istock)
डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय केले जातात. पण वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे डोळ्यांच्या त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील सोपा आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यास डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होतील आणि त्वचा उजळदार दिसेल. घरगुती उपाय कायमच चेहऱ्यावर चमकदार ग्लो आणतात.
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी जेष्ठमधाचा वापर करावा. वाटीमध्ये जेष्ठमध पावडर मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट डोळ्यांभोवती लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे डोळ्यांभोवती आलेले काळे डाग नष्ट होतील आणि त्वचा उजळदार दिसेल. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेली उष्णता कमी होईल आणि डोळ्यांचे सौंदर्य खुलून दिसेल. डोळे कायमच सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी जेष्ठमधाचा वापर करावा.
बदाम तेलाचा वापर केसांच्या मजबूत आणि घनदाट वाढीसाठी केला जातो. बदाम तेलात असलेले घटक त्वचा खूप जास्त चमकदार करतात. डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी हातांवर बदाम तेल घेऊन डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे डोळ्यांखालील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि डोळे सुंदर दिसतील. बदाम तेलात असलेले विटामिन ई त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
मागील अनेक वर्षांपासून गुलाब पाण्याचा वापर त्वचेसाठी केला जात आहे. गुलाब पाणी चेहऱ्यावरील उष्णता कमी करून फोड आणि मुरुमांपासून सुटका मिळवून देते. यासोबतच ८ तासांची झोप, पोषक आहार, भरपूर पाण्याचे सेवन केल्यास त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार राहील. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू नये म्हणून कायमच पचनक्रिया सुरळीत असणे आवश्यक आहे.