उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा उजळदार करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी
हवामानात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो, तसाच परिणाम चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात जास्त बाहेर घराच्या बाहेर फिरल्यामुळे त्वचेवर टॅनिंग वाढू लागते. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि काळी दिसते.चेहऱ्यासोबतच मान, हात खूप जास्त काळी होऊन जाते. याशिवाय काहीवेळा सनस्क्रीन लावून सुद्धा त्वचा काळी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या उन्हात जाणे टाळावे. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि काळे डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण तरीसुद्धा चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
थंडीमध्ये ओठ सतत फुटतात? मग बीटचा वापर करून घरीच बनवा नैसर्गिक लिपबाम, ओठांवर दिसून येईल जादू
चेहऱ्यावर टॅनिंग वाढणे ही नैसर्गिक क्रिया आहे. सूर्यकिरणांमधील अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचण्यासाठी त्वचा मेलॅनिन तयार करते यामुळे चेहऱ्यावर काळेपणा वाढतो. यामुळे त्वचा काळी होते, पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचेचा रंग उजळतो. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि टॅनिंग पूर्णपणे कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचेसंबंधित समस्या कमी होतील.
टॅनिंग कमी करण्यासाठी लिंबू मधाचा फेसपॅक वापरावा. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात मध टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. मधाचा वापर केल्यामुळे त्वचा उजळदार होते आणि नैसर्गिक ग्लो चेहऱ्यावर येतो.
बेसन दह्याचा फेसपॅक बनवण्यासाठी वाटीमध्ये दही आणि बेसन पीठ घेऊन एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होण्यासोबतच टॅनिंग सुद्धा दूर होईल. १५ मिनिटं फेसपॅक चेहऱ्यावर तसाच ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि चमकदार दिसेल.