थंडीमध्ये ओठ सतत फुटतात? मग बीटचा वापर करून घरीच बनवा नैसर्गिक लिपबाम
हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचा, केस आणि संपूर्ण शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. ऑक्टोबर हिट संपल्यानंतर हळूहळू वातावरणात हलकीशी थंडी जाणवू लागते. थंडीच्या दिवसांमध्ये ओठ खूप जास्त कोरडे होऊन जातात. यासोबत ओठ फुटणे, ओठांवरील त्वचा निघणे, लिपस्टिक लावल्यानंतर सुद्धा ओठ कोरडे आणि निस्तेज दिसणे इत्यादी अनेक ओठासंबंधित समस्या उद्भवू लागतात. ओठ कोरडे झाल्यानंतर किंवा ओठ फुटल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे काहीवेळा ओठांमधून रक्त येण्याची शक्यता असते. ओठ कोरडे झाल्यानंतर ओठांवर व्हॅसलिन किंवा किंवा इतर वेगवेगळ्या क्रीम लावल्या जातात.(फोटो सौजन्य – pinterest)
‘या’ जादुई तेलाने होईल केसातील कोंडा त्वरीत फुर्र, गुडघ्यापेक्षाही लांब आणि घनदाट होतील केस
ओठांची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे ब्रँडचे लिपकेअर प्रॉडक्ट आणून लावले जातात. पण तरीसुद्धा ओठांवर कोणताच फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बीटचा वापर करून नॅचरल लिपबाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेले लिपबाम ओठांवरील त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. बीटच्या रसामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक रंग त्वचेवरील त्वचा गुलाबी करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया लिपबाम बनवण्याची सोपी कृती.
लिपबाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटची साल काढून घ्या. त्यानंतर बीटचे लहान लहान तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केलेले बीट टाकून वाटून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून घ्या. मोठ्या वाटीमध्ये बीटचा रस, खोबरेल तेल आणि मेण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेला लिपबाम बंद डब्याच्या झाकणामध्ये भरून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. ३ ते ४ तासांनंतर लिपबाम तुम्ही वापरू शकता. घरच्या घरी बनवलेले लिपबाम ओठांवर गुलाबी चमक आणेल आणि ओठ सुंदर होण्यास मदत करेल.
बीटचा लिपबाम ओठांवर लावल्यामुळे ओठांना अनेक फायदे होतात. यामुळे ओठांवरील मऊपणा कायम टिकून राहील आणि ओठ चमकदार सुंदर दिसतील. घरगुती पदार्थांमध्ये कोणतीही रसायन नसतात. हे लिपबाम संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांसाठी अतिशय प्रभावी ठरेल.थंडीच्या दिवसांमध्ये दिवसभरातून तीन ते चार वेळा ओठांवर लिपबाम लावावे.