रोजच्या आहारात 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नका केळ्यांचे सेवन
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप आवडतात. फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. रोजच्या आहारात काहींना सतत फळे खाण्याची सवय असते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे आणि स्वस्त असलेले फळ म्हणजे केळ. केळ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले घटक आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. यामध्ये पोटॅशियम, वि़टामिन बी6, वि़टामिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. केळी खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते, याशिवाय कमी झालेले वजन वाढण्यास मदत होते. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी अनेक लोक व्यायाम किंवा योगसने केल्यानंतर केळ्यांचे सेवन करतात.(फोटो सौजन्य – iStock)
फळे खायला सगळ्यांचं आवडतात. मात्र काहींना उपाशी पोटी फळे खाण्याची सवय असते. रोजच्या आहारात उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चुकूनही उपाशी पोटी आंबट फळांचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी केळी खाणे हानिकारक ठरू शकते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. केळ्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये विष तयार होऊन पोट दुखी किंवा इतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
उपाशी पोटी केळ्याचे सेवन केल्यामुळे अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. यामध्ये असलेली साखर रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी उपाशी पोटी केळ्याचे सेवन करू नये. याशिवाय शरीराच्या पचनसंस्थेवर ताण येऊन पचनसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटी किंवा पचनसंबंधित समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी केळी खाऊ नयेत.
किडनीसंबंधित आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी केळ्याचे फार कमी सेवन करावे. कारण केळी खाल्यानंतर त्यातील पोटॅशियम शरीर योग्य प्रकारे फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे हायपरक्लेमियाचा धोका वाढू शकतो. केळी खाल्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊन शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.
दैनंदिन आहारात भरपूर केळ्यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन बिघडून जाते. रिकाम्या पोटी केळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. हाड आणि हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायद्याचे नाही.यामुळे शरीराचे संतुलन बिघडून जाते.