उन्हाळ्यात नाकातून वारंवार रक्त का येते?
राज्यभरात सगळीकडे वातावरणात बदल झाला आहे. कधी ऊन पडत आहे तर कधी पाऊस तर अचानक वाजणाऱ्या थंडीमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कारण वाढत्या उन्हाचा फटका सगळ्यांचं पडतो. उष्णता वाढल्यानंतर शरीरसंबंधित आजार होण्याची शक्यता असते. उष्माघात, पाण्याची कमतरता, चक्कर येणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. वारंवार शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक लोक शरीरात दिसणाऱ्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, मात्र हेच आजार मोठे स्वरूप घेण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून टाकते. उष्णता वाढल्यानंतर काहीवेळा अनेकांच्या नाकातून रक्त येऊ लागते. रक्त येण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. पण वारंवार नाकातून रक्त आल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. ही समस्या प्रामुख्या वृद्ध व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वारंवार नाकातून रक्त का येते? रक्त येऊ नये म्हणून कोणते उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
वाढत्या उन्हामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. नाकातून रक्त येणे किंवा उच्च रक्तदाब इत्यादी आजारांची लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे नाकातून रक्त येते. याशिवाय हवेमध्ये बाहेर गेल्यानंतर नाक कोरडे पडून जाते, ज्यामुळे नाकाच्या आतील बाजूस असलेल्या त्वचेला हानी पोहचते. नाकातील त्वचा कोरडी होऊन भेगा पडू लागतात. ज्यामुळे नाकातून वारंवार रक्त येऊ लागते.
उन्हाळ्यात वाढलेले तापमान नाकातून रक्त येण्याचे महत्वाचे कारण आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे नाकाच्या रक्तवाहिन्या इकडेतिकडे पसरून जातात, ज्यामुळे नाकाच्या रक्तवाहिन्यांवर दाब येतो. यामध्ये बऱ्याचदा नाकाच्या रक्तवाहिन्या फुटून जातात. नाकाच्या आतील भागास सूज आल्यानंतर नाकामध्ये वेदना होणे किंवा नाकातून रक्त येण्यास सुरुवात होते.
उन्हाळ्यात आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्येंकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. उन्हाळा वाढल्यानंतर शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. भरपूर पाणी, नारळ पाणी, ताक किंवा इतर थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होईल. पाण्याचे सेवन केल्यामुळे नाकात ओलावा टिकून राहतो.