'या' लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन!
तांब्याच्या भांड्यातील पाण्याला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय तांब्याच्या भांड्याचा वापर मागील अनेक पिढ्यांपासून केला जात आहे. पूर्वीच्या काळी सर्वच घरांमध्ये तांब्याच्या भांडी होती. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. नियमित तांब्याच्या भांड्यातील प्यायल्यास पचनक्रिया निरोगी राहते, शरीर डिटॉक्स होते, शरीरातील उत्साह वाढतो आणि शरीराला आवश्यक खनिजे मिळतात. अनेक घरांमध्ये अजूनही तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी भरून ठेवले जाते. पण वारंवार तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी दैनंदिन वापरात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
किडनीसंबंधित आजाराची लागण झालेल्या लोकांनी चुकूनही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. कारण यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम करते. पण किडनीच्या कार्यात अडथळे आल्यानंतर किडनीमधील विषारी घटक बाहेर पडून जात नाही. त्यामुळे शरीरात तांब साचून राहत. किडनी फेल्युअर, किडनी स्टोन किंवा किडनीच्या इतर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी न पिता काच किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमधील पाणी प्यावे.
विल्सन डिसीज हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात तांब्याचे घटक तसेच साचून राहतात. याशिवाय लिव्हर, मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे चुकूनही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे अजिबात सेवन करू नका.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी अजिबात पिऊ नये. यामुळे आई आणि बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीरातील तांब्याची पातळी असंतुलित होऊन जाते.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे:
तांब्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तांब्यामध्ये असलेले गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना घ्यायची काळजी:
तांब्याचे भांडे रोज स्वच्छ धुवा आणि त्यात पाणी भरून रात्रभर ठेवा. पाणी जास्त काळ तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास ते विषारी बनू शकते, म्हणून एका रात्रीपेक्षा जास्त काळ पाणी ठेवू नका.