उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेले 'हे' उपाय ठरतील प्रभावी
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, सतत तिखट तेलकट पदार्थांचे सेवन, मानसिक ताण, अपुरी झोप इत्यादी अनेक कारणांमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. शरीरात सतत दिसून येणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. हल्ली अनेकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढू लागली आहे. शरीरात अचानक वाढलेला उच्च रक्तदाब हृदय आणि रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम करतो. याशिवाय काहीवेळा हॉर्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनी खराब होणे इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. त्यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेले काही प्रभावी उपाय सांगणार आहोत, हे उपाय केल्यास शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य – istock)
सामान्यपणे रक्तदाब १२०/८० इतका असणे आवश्यक आहे. पण उच्च रक्तदाब वाढल्यानंतर १४०/९० इतका होऊन जातो. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास हृदयाच्या रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करणे आवश्यक आहे. प्राणायाम केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात वाढलेला तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करावे. शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम करावे. यामुळे नसा शांत होतात आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कडधान्य खावे. आहारात स्प्राऊट्स, सॅलड, काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि काळे मीठ इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, विटामिन आणि मिनरल्स इत्यादी आवश्यक पोषक घटक आढळून येतात. भिजवलेले मूग दह्यात मिक्स करून सकाळच्या नाश्त्यात खावे.
दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहते. पालेभाज्या खाल्यामुळे आरोग्य सुधारते. त्यामुळे आहारात कायमच भाज्यांचे सूप किंवा भाज्या शिजवून खाव्यात. याशिवाय पालेभाज्या खाल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. पालेभाज्या शिजवताना त्यात कमी तेल आणि कमी मीठ खावे.
उच्च रक्तदाब म्हणजे काय?
जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जास्त दाबाने फिरते, तेव्हा या स्थितीला उच्च रक्तदाब म्हणतात.रक्तदाब milimitar of mercury (mmHg) मध्ये मोजला जातो.सामान्यतः रक्तदाब 120/80 mmHg किंवा त्याहून कमी असतो.
उच्च रक्तदाबाची कारणे:
अति ताण आणि चिंताआहारात मिठाचे आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणवजन जास्त असणेनियमित व्यायामाचा अभावआनुवंशिक कारणेखूप कमी किंवा खूप जास्त झोप घेणे.
उच्च रक्तदाबाची लक्षणे:
उच्च रक्तदाब असलेल्या अनेक लोकांना लक्षणे दिसत नाहीत, पण अति उच्च रक्तदाबाच्या स्थितीत (180/120 mmHg पेक्षा जास्त) डोकेदुखी, छातीत दुखणे, धाप लागणे, डोळे अंधुक होणे आणि नाकातून रक्त येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.