दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे दात अस्वच्छ दिसतात? मग अभिनेत्री निया शर्माने सांगितलेला 'हा' उपाय ठरेल प्रभावी
बॉलिवूड अभिनेत्री निया शर्मा टीव्हीवरील स्टायलिश आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून म्हणून प्रसिद्ध आहे. ती तिच्या सुंदरता आणि स्माईलसाठी सगळीकडे ओळखली जाते. तिचे सुंदर पांढरे शुभ्र दात सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. निया आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत काहींना काही शेअर करत असते. नुकतंच तिने दातांवर वाढलेला पिवळा थर कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. हा उपाय केल्यामुळे दातांवर वाढलेला पिवळा थर कमी होण्यासोबतच दात अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतील. सर्वच महिलांसह पुरुषांसुद्धा चमकदार आणि पांढरेशुभ्र दात हवे असतात. दात सुंदर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. परंतु दातांवरील पिवळा थर काही केल्या कमी होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
दातांवर वाढलेला पिवळा थर कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या टूथपेस्ट किंवा इतर अनेक वेगवेगळे माऊथ फ्रेशनर वापरले जातात. पण तरीसुद्धा दात पांढरे होत नाही. दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे चारचौघांमध्ये मनमोकळेपणाने हसताना सुद्धा लाजिरवण्यासारखे वाटू लागते. त्यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे दातांवर वाढलेला पिवळा थर कमी होतो आणि दात अतिशय सुंदर दिसू लागतात. केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा घरगुती पदार्थांचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करावा. दातांवर पिवळेपणा वाढण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत. चहा-कॉफीचे अतिसेवन, स्मोकींग इत्यादींमुळे दात अतिशय पिवळे होऊन जातात.
दातांवर वाढलेला पिवळा थर कमी करण्यासाठी बेकींग सोडा, लिंबू, नारळाचे तेल, मीठ या पदार्थांचा वापर करावा. स्वयंपाक घरात हे पदार्थ सहज उपलब्ध होतात. वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात टूथपेस्ट घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट हिरड्या आणि दातांवर लावून हलक्या हाताने किंवा ब्रेशने घासा. यामुळे पिवळे झालेले दात स्वच्छ होण्यास मदत होईल. यामुळे दातांवर जमा झालेला प्लेक कमी होण्यास मदत होईल. पायरीया आणि कॅव्हिटीज यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा.
दात आणि तोंडाची काळजी कशी घ्यावी:
दररोज दिवसातून दोनदा फ्लोराईडयुक्त टूथपेस्टने दात ब्रश करा. दातांमधील अन्नकण आणि प्लेक काढण्यासाठी दररोज फ्लॉसिंग करा. मजबूत दातांसाठी संतुलित आहार घ्या आणि गोड पदार्थ कमी खा.
दात गिळल्यास काय होते:
दात कॅल्शियमपासून बनलेले असतात, त्यामुळे पोटात पचतात आणि सामान्यतः कोणतीही समस्या निर्माण करत नाहीत.