मधुमेह- कोलेस्ट्रॉल होईल कायमचा गायब! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' पदार्थांचे सेवन
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप आणि चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. अपचन, मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तात वाढलेल्या साखरेचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. सकाळी उठल्यानंतर शरीर शुद्ध अवस्थेमध्ये असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ शरीराची ऊर्जा वाढवतात.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मधात किंवा तुपात भाजलेली लसूण खाल्यास शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल आणि रक्त पातळ होण्यास मदत होईल. लसूणमध्ये शरीरास आवश्यक असलेले अनेक घटक आढळून येतात. लसूण केवळ पदार्थाची चव वाढवण्यासाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादी पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एक पाकळी लसूण खावी. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लसूण गुणकारी ठरतो.
स्वयंपाक घरातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना गुळाचा वापर केला जातो. नैसर्गिक गोडवा आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गूळ शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरते. सकाळी उठल्यानंतर ब्रश न करता कोमट पाण्यासोबत गुळाचा बारीक खडा चावून खाल्यास शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाईल. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आतड्यांमधील हालचाल सुलभ होण्यासाठी गूळ खावे. शरीरात साचलेले हानिकारक घटक बाहेर काढून टाकण्यासाठी गूळ खावे.
आंबट गोड चवीचे मनुके लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. एक ग्लास पाण्यात मनुके भिजवत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठून उपाशी पोटी मनुके आणि पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. मनुकामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि विटामिन बी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मनुके खावेत.