Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळी येण्याआधी महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ गंभीर संकेत, शारीरिक समस्यांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी महिलांच्या शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जाणून घ्या मासिक पाळी येण्याआधी दिसणारे संकेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 21, 2025 | 08:33 AM
मासिक पाळी येण्याआधी महिलांच्या शरीरात दिसून येतात 'हे' गंभीर संकेत

मासिक पाळी येण्याआधी महिलांच्या शरीरात दिसून येतात 'हे' गंभीर संकेत

Follow Us
Close
Follow Us:

मासिक पाळी म्हणजे काय?
पाळीचे चक्र किती दिवसांचे असते?
मासिक पाळी येण्याआधी शरीरात दिसून येणारी लक्षणे?

प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येणे हे स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक चक्र आहे. पालीचा कालावधी साधारणता ५ ते ६ दिवसांचा असतो. दर महिन्याला स्त्रियांच्या गर्भाशयातून रक्तस्त्राव होतो, जो गर्भधारणेसाठी तयार झालेल्या गर्भाशयाच्या अस्तराचा भाग असतो. मासिक पाळीचे चक्र चाट टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. मासिक पाळी, फॉलिक्युलर, ओव्हुलेशन आणि ल्यूटियल ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स नियंत्रित होतात. पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना असह्य वेदना, कंबर दुखणे, पाठ दुखणे, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या उद्भवू लागतात. ही लक्षणे मासिक पाळी आल्यानंतर दिसून येतात. पण काहींना मासिक पाळी येण्याआधी सुद्धा गंभीर संकेत दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी येण्याआधी शरीरात कोणते संकेत दिसून येतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

वाढत्या स्क्रीन टाईममुळे फक्त ६ तासांची झोप होते? आरोग्यासंबंधित उद्भवेल ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

मासिक पाळी येण्याच्या काही दिवसाआधी महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल दिसू लागतात. यामध्ये प्रामुख्याने इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन बदलू लागतात. केवळ शारीरिक नाहीतर मानसिक बदल होण्याची सुद्धा शकता असते. मासिक पाळीचा परिणाम मानसिक आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे जीवनशैलीत होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

मासिक पाळी येण्याआधी शरीरात दिसून येणारे संकेत:

स्तनांमध्ये जडपणा किंवा वेदना:

मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी स्तनांमध्ये जडपणा किंवा हलका स्पर्श झाल्यानंतर खूप जास्त वेदना होतात. शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स वाढल्यामुळे दुग्धग्रंथींमध्ये सूज येऊन स्तनांमध्ये वेदना होतात. हा त्रास पाळी येण्याच्या आधी होतो आणि पाळी आल्यानंतर हळूहळू कमी होतो. पण वारंवार स्तनांमध्ये वेदना होत असतील दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पचनाच्या समस्या आणि गॅस:

पाळी येण्याच्या काही दिवसाआधी बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, ऍसिडिटी इत्यादी पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. याशिवाय काहींना जुलाब देखील होतात. ‘प्रोस्टाग्लँडिन्स’ नावाचे रसायन गर्भाशयासोबतच आतड्यांच्या हालचालींवर परिणाम करते. यामुळे काहीवेळा पोट फुगणे, पोटात जडपणा वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

झोपेत बदल आणि थकवा:

शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. हार्मोन्सच्या चढ उतारामुळे शरीराचे तापमान बदलते. ज्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप येत नाही. तसेच संपूर्ण दिवस प्रचंड थकवा आणि सुस्ती जाणवू लागते. याला वैद्यकीय भाषेत Period Fatigue असे म्हणतात.

अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय? शरीरसंबंधित वाढेल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध

त्वचेवर अचानक पुरळ येणे:

मासिक पाळी येण्याआधी आवर्जून दिसणारे लक्षण म्हणजे चेहऱ्यावर किंवा हनुवटीवर फोड येणे. हनुवटीवर किंवा जबड्याच्या रेषेवर अचानक पिंपल्स आल्यास समजून जावे की मासिक पाळी येऊ शकते. ओव्हुलेशननंतर त्वचेतील सीबम उत्पादन वाढू लागते, ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळी म्हणजे काय?

    Ans: मासिक पाळीचा भाग म्हणून गर्भाशयाच्या अस्तरातून होणारा रक्तस्त्राव.

  • Que: कधी सुरू होते आणि किती दिवस चालते?

    Ans: साधारणपणे मुली १२-१३ वर्षांच्या झाल्यावर मासिक पाळी सुरू होते, पण काहीवेळा आधी किंवा उशिराही सुरू होऊ शकते.

  • Que: मासिक पाळीशी संबंधित समस्या?

    Ans: पाळी २१ दिवसांपेक्षा कमी किंवा ३५ दिवसांपेक्षा जास्त वेळा येत असेल तर ती अनियमित मानली जाते.

Web Title: These serious signs appear in womens bodies before menstruation menstrual syndrome

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • Menstrual health
  • Periods
  • women health

संबंधित बातम्या

Women Health: UTI इन्फेक्शन म्हणजे काय? जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय, दुर्लक्ष केल्यास होईल किडनीचे नुकसान
1

Women Health: UTI इन्फेक्शन म्हणजे काय? जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय, दुर्लक्ष केल्यास होईल किडनीचे नुकसान

महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
2

महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.