पचनसंस्थेवर ताण आल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता, अपुरी झोप, अवेळी जेवणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे पचनक्रिया बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा अनेकांना पचनसंबंधित समस्या उद्भवतात. पोटात गॅस, अपचन झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतात. शरीरात निर्माण झालेला गॅस बाहेर पडून गेला नाहीतर आरोग्य बिघडते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात दुखणे, गॅस, अपचन, असिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय पोटासंबंधित समस्येचा गंभीर परिणाम मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सतत पचनक्रिया बिघडल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पचनसंस्थेवर ताण आल्यानंतर किंवा पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
जंक फूडचे सेवन, अतिप्रमाणात तेलकट तिखट खाणे, अवेळी जेवणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. पोटामध्ये गॅस झाल्यानंतर पोटदुखीची समस्या उद्भवू लागते. तसेच पोट फुगल्यासारखे वाटू लागते. नेहमी नेहमी पचनक्रिया बिघडू लागल्यास पचनसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
पोटात निर्माण झालेला गॅस दीर्घकाळ धरून ठेवल्यामुळे छातीमध्ये जळजळ होऊन अस्वस्थ वाटू लागते. याशिवाय पोटात दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे पोटात निर्माण झालेला गॅस योग्य वेळी बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. पोट फुगल्यानंतर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही, तसेच शरीरात अस्वस्थ वाटू लागते.
पचनक्रिया बिघडल्यानंतर मानसिक ताण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटात साचून राहिलेला गॅस वाढून अनेक गंभीर समस्या उद्भवतात. पोटात साचून राहिलेला गॅस बाहेर पडून गेल्यानंतर अनेकदा लाजिरवण्यासारखे वाटते. दीर्घकाळ पोटात गॅस साचून राहिल्यामुळे मनाची एकाग्रता कमी होऊन जाते. याचे चुकीचे परिणाम मानसिक आरोग्य होण्याची शक्यता असते.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
पचनक्रिया बिघडू नये म्हणून शरीराला पचन होतील अशा पदार्थांचे सेवन करावे. अशावेळी कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे पचनाचा त्रास होणार नाही. आहारामध्ये फळे, पालेभाज्या, सुकामेवा, थंड पदार्थ इत्यादी गोष्टींचे सेवन करावे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून गेले नाहीतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.