File Photo : Weather
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच महानगरात हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यांसारखे आजार वाढले आहेत. पीएम 2.5 धोकादायक पातळीवर गेला आहे. हा एक कण आहे जो श्वासाद्वारे सहजपणे शरीरात प्रवेश करतो. हे मानवी आरोग्यासाठी सर्वात हानिकारक मानले जाते.
हेदेखील वाचा : Pune Traffic: पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMC ॲक्शन मोडमध्ये; ‘हा’ प्रकल्प घेतला हाती
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, प्रति घनमीटर ६० मायक्रोग्रामची प्रदूषण सुरक्षित मर्यादा ओलांडली गेली आहे, ज्याची कमाल पातळी २४९ नोंदवली गेली आहे. वांद्रे पूर्व आणि वरळी येथे सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली. महानगराचा हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत राहिला. त्यामुळे प्रदूषित हवेपासून मुंबईकरांनी सावध असावे.
आठवड्यात हवामानातील बदल कायम राहणार
सध्या मुंबईत असामान्यपणे उष्ण थंड हवामान अनुभवले जात आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थोडीशी थंडी जाणवत आहे. दिवसाचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे, जे सामान्यपेक्षा ४ अंशांनी जास्त आहे. या आठवड्यातही असेच हवामान राहील. २३ जानेवारीपर्यंत दिवसाचे तापमान ३५ अंशांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचप्रमाणे, किमान तापमान देखील सामान्यपेक्षा जास्त १९-२० अंशांवर राहण्याची अपेक्षा आहे.
हवामान तज्ञांच्या मते, मध्य भारतात निर्माण झालेल्या अँटी-सायक्लोनचा हा परिणाम आहे. यामुळे पूर्वेकडून उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत.
प्रदूषण कुठे आहे ?
वांद्रे पूर्व- २२३, वरळी- २२२, बीकेसी- २०८, देवनार- २०७, मालाड- १७५, सायन- १६६, माझगाव- १६५, नेव्ही नगर- १६३, विलेपार्ले- १६०, जुहू- १५९, पवई- १५७, मुंबई विमानतळ क्षेत्र १५६, कुलाबा- १४८, कुर्ला- १३८ आणि बोरिवली येथे १२८ चा एक्यूआय नोंदवला गेला.
हेदेखील वाचा : Expressway Block: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक; कोणत्या मार्गांवर असणार वाहतूक सुरू? वाचा