किडनी फेल झाल्यानंतर लघवीमध्ये दिसून येतात 'हे' गंभीर बदल
दैनंदिन आहारात होणारे छोटे मोठे बदल, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक ताण, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे केल्यामुळे छोटे आजार आणखीनच गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीवाटे आणि घामावाटे निघून जातात.किडनीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात सामान्य लक्षणे दिसू लागतात. लघवीतून येणारा फेस, लघवीचा रंग बदलणे किंवा वारंवार लघवीला होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – iStock)
लघवीमध्ये होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करावे. किडनी खराब झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे येऊ लागतात. किडनी खराब झाल्यानंतर लघवीमध्ये बदल होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी खराब झाल्यानंतर लघवीमध्ये कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे येत्या काळात आरोग्यासंबंधित उद्भवणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
किडनी फेल झाल्यानंतर लघवीमध्ये अनेक बदल दिसून येतात. लघवीचा रंग पिवळसर दिसू लागतो. याशिवाय काहींच्या लघवीचा रंग अतिशय गडद होऊन जातो. तसेच किडनी योग्यरीत्या काम करत नसल्यास लघवी गडद पिवळी, तपकिरी किंवा नारंगीसर होऊन जाते. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लघवीमधून फेस येऊ लागतो. याशिवाय रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे किडनी फेल झाल्यानंतर दुर्लक्ष करू नये.
बऱ्याचदा मसालेदार किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ होऊ लागते. मात्र किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर सुद्धा लघवीमध्ये सतत जळजळ वाढते. लघवी करताना चिमट्याप्रमाणे दुखणं किंवा वेदना होऊ लागतात. संपूर्ण शरीरात संसर्ग पसरल्यास किडनीला सूज येणे किंवा किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात.
बऱ्याचदा लघवी करताना फेस येऊ लागतो. मात्र अनेक लोक ही समस्या अतिशय सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र ही समस्या सामान्य नसून किडनी फेल झाल्याचे संकेत असतात. लघवीमधून शरीरातील प्रोटीन बाहेर पडून जाते. शरीरातील प्रोटीन बाहेर पडून जाणे अतिशय धोक्याचे आहे. त्यामुळे लघवीत येणाऱ्या फेसाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.