पोटात साठून राहिलेला गॅस क्षणार्धात पडून जाईल बाहेर!
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराचिउ पचनक्रिया बिघडते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात गॅस होणे, अपचन, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे रोजच्या आहारात शरीरात पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे शरीराच्या इतर अवयवांना इजा होण्याची शक्यता असते. यामुळे डोकं दुखणे, उलट्या, मळमळ किंवा जुलाब होण्याची जास्त शक्यता असते. चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. पोटात गॅस झाल्यानंतर अनेक लोक गोळ्या घेतात.मात्र सतत गोळ्या घेतल्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – iStock)
पोटात निर्माण झालेल्या गॅसमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. गॅस वाढल्यानंतर कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात निर्माण झालेला गॅस बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या गॅसच नव्हे तर आरोग्यासंबंधित इतर समस्यांपासून सुद्धा आराम मिळेल.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले हिंग जेवणातील पदार्थ बनवताना वापरले जाते. जेवणात हिंग टाकल्यास पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते. गॅस, ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर अर्धा ग्लास पाण्यात चिमूटभर हिंग टाकून मिक्स करून प्यावे. यामुळे पोटातील वायू सहज निघून जातील. हिंगामध्ये अँटी-स्पॅस्मोडिक गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, यामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते.
जेवणानंतर नियमित बडीशेप चावून खावी. यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवत नाही. याशिवाय गॅस किंवा अपचन झाल्यास टोपात पाणी ग्राम करून त्यात बडीशेप टाकून पाणी तयार करावे. तयार केलेले पाणी सेवन केल्यास पोटात थंडावा कायम टिकून राहील आणि अपचन, गॅसची समस्या उद्भवणार नाही. बडीशेपमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात.
दाहक विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले आलं दैनंदिन आहारात खावे. सकाळी उठल्यानंतर दुधाच्या चहाचे सेवन करण्याऐवजी आल्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. गॅस अपचनाची समस्या जाणवू लागल्यास आल्याचे पाणी प्यावे. आल्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून प्यायल्यास पोटातील वायू बाहेर पडून जातील.