मानसिक आजार महाभयंकर! डिप्रेशन वाढू लागल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. कधी कामाचा वाढलेला तणाव, कुटुंबिक तणाव तर कधी स्वतःच्या आरोग्याची बिघडलेली स्थिती इत्यादी अनेक गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला मानसिक तणाव बऱ्याचदा लगेच दिसून येत नाही. आपल्या आजूबाजूला असलेली हसत खेळत राहणारी माणसं बऱ्याचदा कोणत्या कोणत्या मोठ्या मानसिक तणावात अडकलेली असतात. मानसिक आजारांमध्ये वेगाने वाढणारा आजार म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशन संपूर्ण शरीर पोखरून काढते. यामुळे मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्याला सुद्धा हानी पोहचण्याची शक्यता असते. डिप्रेशन वाढल्यानंतर शरीराला कमी आणि मनाला जास्त ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेली डिप्रेशनची लक्षणे योग्य वेळी ओळखून औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
डिप्रेशन वाढलेल्या व्यक्तीच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. कोणत्याही कामात लक्ष न लागणे, सतत थकवा अशक्तपणा जाणवणे, कोणत्याही गोष्टींमध्ये व्यवस्थित लक्ष न लागणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात. शरीरात वाढलेली डिप्रेशनची लक्षणे ओळखून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे वेळीच न ओळ्खल्यास मृत्यूसुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डिप्रेशन वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे बऱ्याचदा कोणत्याही कामात व्यवस्थित लक्ष लागत नाही. शरीरात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. काम करताना शरीर जड वाटणे हे डिप्रेशन येण्याचे प्रमुख लक्षण आहे. सतत सुस्त राहणे, कोणाशी बोलावंसं वाटत नाही आणि आयुष्य नकोसे वाटणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात.
मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर झोपेची गुणवत्ता खराब होऊन जाते. झोप न येणे, अचानक झोपेतून जाग येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अपुऱ्या झोपेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे कधीच फ्रेश वाटत नाही. मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे.
आतड्यात सडलीये घाण पण जीभ दिसते सफेद, काय आहे कारण; दुर्लक्ष करणे ठरेल चुकीचे
डिप्रेशन वाढल्यानंतर अचानक कोणत्याही कारणामुळे रडू येऊ लागते. डोळ्यांमधून अचानक अश्रू वाहू लागतात. सगळं काही संपवून टाकावं किंवा कुठेही जाऊ नये, अशी इच्छा मनात सतत निर्माण होते. डिप्रेशन वाढल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार आवश्यक करावे. अन्यथा शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.