हार्ट ब्लॉकेजची लक्षणे
धावपळीच्या जीवनात अनेक लोक फक्त सतत कामाकडेच लक्ष देतात. तासनतास काम करत राहिल्यामुळे शरीर पूर्णपणे थकून जाते. थकलेल्या शरीराला आणि मनाला आराम देणे गरजेचे आहे. असे न करता अनेक लोक चुकीच्या पद्धतीने जीवन जगत असतात. सतत बाहेरचे पदार्थ खाणे, अपुरी झोप, रात्रभर जागे राहणे इत्यादी गोष्टींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. तसेच हळूहळू शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून हृदयाचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. हार्ट ब्लॉकेज झाल्यानंतर हृदयाच्या रक्तप्रवाहात अनेक अडचणी निर्माण होतात. शरीराचे कार्य पूर्णपणे बिघडून जाते.(फोटो सौजन्य-istock)
हृदयाचा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे आणि हृदयाला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेकदा जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवल्यानंतर सुद्धा घरगुती उपाय करून हृदयाच्या आरोग्याची तपासणी करू शकता. त्यामुळे तुमचे हृदय निरोगी आणि आहे की नाही, हे समजण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत मिश्र कडधान्यांचे चाट
हार्ट ब्लॉकेजेचा त्रास होण्यास सुरुवातीच्या वेळी चालताना दम लागणे किंवा कमी व्यायाम केल्यानंतर सुद्धा दम लागण्यास सुरुवात होते. त्यामुळे घरी बसल्या तुम्ही ही चाचणी करू शकता. 10 मिनिटे चालून आल्यानंतर तुम्हाला जर दम लागत असेल तर हृद्यासंबंधित समस्या असल्याचे संकेत आहेत, हे स्पष्ट होते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करावेत.
वाढलेला रक्तदाब हे हार्ट ब्लॉकेजेचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे आठवड्यतून एकदा किंवा दोनदा रक्तदाब चेक करणे आवश्यक आहे. घरी रक्तदाब चेक करताना तुमचा रक्तदाब नेहमी पेक्षा जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होण्याची शक्यता असते. योग्य तो आहार आणि व्यायाम करून रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
सतत छातीमध्ये जळजळ किंवा वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर काही लोक असिडिटी म्हणून सोडून देतात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.चालल्यानंतर किंवा शारीरिक हालचाली केल्यानंतर हृदयात वेदना होत असतील तर हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्या बंद होऊन जातात. शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला पिवळा थर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडवण्यास मदत करतो. यामुळे हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.