कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या या भागांमध्ये होतात वेदना
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन करणे, तेलकट किंवा तिखट पदार्थ , अपुरी झोप, कामाचा तणाव, सतत सोशल मीडिया पाहत बसणे इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडते आणि शरीरातील विषारी पदार्थ पोटात तसेच साचून राहतात. यामुळे प्रामुख्याने कोलेस्ट्रॉल होण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल झाल्यानंतर हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात योग्य पौष्टिक आणि पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. पण काही लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा थर साचण्यास सुरुवात होते. हा थर शरीरात साचून राहिल्यानंतर हृदयविकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: पोटाच्या कॅन्सरमुळे अतुल परचुरे यांचे निधन! लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर अचानक पाय दुखण्यास सुरुवात होते. कारण पायांच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल साचण्यास सुरुवात होते. रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. काहीवेळा अचानक पायात क्रॅम्स येणे किंवा पाय दुखु लागतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे.
शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर अचानक हात दुखु लागतात. हात आणि खांद्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हातांमधील रक्तप्रवाह कमी होऊन जातो. ज्यामुळे हातांच्या नसा किंवा खांदा दुखण्यास सुरुवात होते. सतत हातापायांना मुंग्या येऊ लागतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
हे देखील वाचा: जपानी लोकांसारखी सुंदर त्वचा हवी आहे? मग नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्या वयात दिसाल सुंदर
शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर पाठीमध्ये दुखण्यास सुरुवात होते. पाठ दुखीचा त्रास उद्भवल्यानंतर आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल पाठीचा कणा आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातील रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात.