रात्रीच्या वेळी शरीरात जाणवणारी 'ही' लक्षणे ठरू शकतात मोठ्या आजारांचे संकेत
दिवसभर काम करून थकून आल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. निरोगी आरोग्यासाठी शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपेमुळे शरीराच्या सर्वच अवयवांना आराम मिळतो. याशिवाय शांत झोप घेतल्यामुळे मन शांत राहते. मानसिक तणाव कमी होतो आणि तुम्ही कायमच फ्रेश आणि आनंदी राहता. पण आपल्यातील अनेकांना रात्रीच्या वेळी झोप लागत नाही. कितीही थकून आल्यानंतर शांत झोपण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा झोप येत नाही. झोपेची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. झोपेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. अपुऱ्या झोपेमुळे पचनक्रिया बिघडणे, काम करण्याची इच्छा न होणे, तणाव वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
कायमच निरोगी आरोग्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही कायमच फ्रेश राहता. पण रात्रीच्या वेळ झोप लागत नसेल तर आरोग्यासंबंधित समस्या यास कारणीभूत ठरतात. हृदय, किडनी आणि लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रात्रीच्या वेळी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रात्रीच्या वेळी दोन किंवा तीन वेळेपेक्षा जास्त वेळ लघवीला जावे लागत असेल तर दुर्लक्ष करू नये. ही समस्या जास्त पाणी प्यायल्यामुळे किंवा मधुमेह झाल्यानंतर उद्भवू लागते. तसेच किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर वारंवार लघवीला जावे लागते. तसेच मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सतत लघवीला जावे लागते. निरोगी किडनी रात्री यूरिन प्रोडक्शनला कंट्रोल करते,पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होत असतील तर रात्रीच्या वेळी किडनी यूरिन प्रोडक्शनला कंट्रोल करू शकत नाही.
रात्री झोपल्यानंतर अनेकांना श्वासाची समस्या उद्भवू लागते. झोपेमध्येच अचानक श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. हृदय कमजोर झाल्यानंतर अचानक कधीही श्वास घेण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. फुप्फुसांमध्ये तरल पदार्थ जमा झाल्यामुळे ही समस्या प्रामुख्याने उद्भवू लागते. वारंवार श्वासासंबंधित समस्या उद्भवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर पायांना अचानक सूज येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. याशिवाय पायांमध्ये काहीवेळा जडपणा जाणवू लागतो. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात फ्यूइड जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे पायांना अचानक सूज येणे किंवा शरीराला सूज येण्याची जास्त शक्यता असते.