नसांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमचे बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पिवळ्या दाण्यांचे करा सेवन
रोजच्या आहारात काहींना सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. पण वारंवार तिखट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करतात. तर खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर तयार करतात. पिवळ्या रंगाचा चिकट थर रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिल्यास हृदयापर्यंत रक्त पोहचत नाही.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात सतत तिखट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पिवळ्या दाण्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या दाण्यांचे नियमित सेवन केल्यास शरीरात वाढलेला मधुमेह, खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.
वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे सेवन करावे. मेथी दाण्यांमध्ये असलेले फायबर शरीरासाठी आवश्यक आहे. यामध्ये कॅल्शिअम, फोलिक अॅसिड, कॉपर आणि पोटॅशिअम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि इतरही काही विटामिन आढळून येतात. त्यामुळे नियमित मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. मेथी दाण्यांमध्ये असलेले कंपाउंड लिव्हरच्या मदतीने कोलेस्टेरॉलचे एक्ट्रा प्रॉडक्शन रोखण्यास मदत करतो. त्यामुळे मेथी दाण्यांचे सेवन करावे.
‘हा’ भयानक आजार झाल्यानंतर सडून जातात शरीरातील अवयव, योग्य वेळी लक्षणे ओळखून डॉक्टरांचा घ्या सल्ला
मेथी दाण्यांमध्ये स्टेरॉयडल सॅपोनिन नावाचे तत्व आढळून येते. हे तत्व आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. मेथीच्या बिया लिव्हरमध्ये असलेल्या एलडीएल वाढवण्यास मदत करतात. मेथीचे दाणे संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. मेथी दाण्यांचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात रात्रभर मेथी दाणे भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यासोबतच तुम्ही भिजवलेले मेथी दाणे सुद्धा खाऊ शकता. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डायबिटीज, हार्ट फेलियर आणि ट्रिपल वेसल डिजीज इत्यादी अनेक गंभीर आजारांचा धोका टाळतो.