गुटखा खाऊन सडलेले दात स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' मसाल्याचा करा वापर
निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्ती सतत काहींना काही करत असते. पण दातांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिले जात नाही. दातांवर वाढलेला पिवळ्या रंगाचा थर,दातांना लागेल कीड इत्यादी अनेक गोष्टींकडे सतत दुर्लक्ष केले जाते. पण दातांचे आरोग्य स्वच्छ असणे अतिशय महत्वाचे आहे. हसताना किंवा बोलताना दातांवरील पिवळेपणामुळे महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळी किंवा पेनकिलरच्या गोळ्या आणून खातात. पण सतत पेनकिलर खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. पेनकिलरच्या गोळ्यांमुळे किडनी निकामी होते.(फोटो सौजन्य – istock)
दातांवर वाढलेल्या पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या थरामुळे चारचौघात मनमोकळेपणाने हसता येत नाही. यामुळे दात व्यवस्थित दिसत नाहीत. दातांवर वाढलेला पिवळा थर कमी करण्यासाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. पण हे उपाय करूनसुद्धा दात स्वच्छ होत नाही. अनेकांना सतत गुटखा किंवा तंबाखू खाण्याची सवय असते. सतत गुटखा तंबाखू खाल्यामुळे दातांसोबतच हिरड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दात स्वच्छ करण्यासाठी कोणत्या स्वयंपाक घरातील कोणत्या मसाल्यांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे मसाले आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होईल.
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक लोक दात स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करतात. तसेच लवंग आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. दातांवर तुरटी लावल्यामुळे दातांवर वाढलेला पिवळेपणा, पांढरा थर, कीड आणि तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तसेच लवंग खाल्यामुळे तोंडाला दुर्गंधीचा घाणेरडा वास येत नाही. यासाठी अर्धा लिटर पाण्यात 7 किंवा 8 लवंग टाकून ठेवा. त्यानंतर त्यात 5 मिनिटं तुरटीचा एक तुकडा टाकून ठेवा. तयार करून घेतलेले मिश्रण 3 दिवस झाकून तसेच ठेवा. तयार केलेले मिश्रण दात स्वच्छ घासून झाल्यानंतर पाण्याने गुळण्या करा. यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होईल.
वाटीमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दातांवर लावून हाताने घासा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी होईल आणि दात स्वच्छ होतील. बेकिंग सोड्यात असलेले गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.