
Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
1. सारखं लघवीला जाणं: गरोदरपणात शरीरात हार्मोन्स बदलतात आणि पोटात बाळ मोठं होतं. त्याचा दाब थेट लघवीच्या पिशवीवर येतो. त्यामुळे सारखं लघवीला जावं लागतं, विशेषतः रात्री. झोप लागली की परत उठावं लागतं.
2. अॅसिडिटी आणि छातीत जळजळ: या काळात पोटावर पण दाब येतो. त्यामुळे जेवलं की अॅसिड वर येतं, छातीत जळजळ होते, अपचन होतं. रात्री जेवून लगेच झोपलं की हा त्रास अजून वाढतो.
3. पाठ आणि पाय दुखणं: वजन वाढल्यामुळे सगळा भार कंबर आणि पाठीवर येतो. त्यामुळे पाठ खूप दुखते. काही महिलांना रात्री पायात गोळे येतात, पाय सतत हलवावेसे वाटतात. त्यामुळे झोप मोडते.
4. बाळाची हालचाल: पोटातलं बाळ काही वेळा रात्री खूप ऍक्टिव्ह होतं. लाथा मारतं, हालचाल करतं. त्यामुळे आईला झोप लागणं किंवा लागलेली झोप टिकणं कठीण होतं.
Metabolic Disorders: दिसायला अगदी निरोगी असलेल्या बाळाला आतून काही मेटाबॉलिक आजार असू शकतो का?
5. डोक्यात सतत विचार: डिलिव्हरी कशी होईल, बाळ नीट असेल ना, मी चांगली आई होईल ना, असे विचार सारखे डोक्यात येतात. त्यामुळे मन शांत होत नाही आणि शरीर थकलेलं असून पण झोप येत नाही.
मार्केटमध्ये गरोदर महिलांसाठी खास मोठ्या उशा मिळतात. त्या नसेल तर साध्या दोन-तीन उशा घ्या. एक पोटाखाली, एक पाठीला, एक गुडघ्यामध्ये ठेवा. त्यामुळे कुशीवर झोपणं खूप आरामदायी होतं.
कुशीवर झोपा: शेवटच्या महिन्यात डॉक्टर पण कुशीवरच झोपायला सांगतात, शक्यतो डाव्या कुशीवर. झोपेत कधी चुकून पाठीवर झोप लागली तरी घाबरू नका. लक्षात आलं की हळूच परत कुशीवर वळा.
रात्री जड जेवण नको: रात्री झोपायच्या दोन तास आधीच जेवून घ्या. खूप तेलकट, तिखट किंवा जड जेवण टाळा. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होईल.चहा-कॉफी कमी करा: संध्याकाळनंतर चहा, कॉफी पिऊ नका. त्यात कॅफिन असतं त्यामुळे झोप उडते.
झोपेची वेळ फिक्स करा: रोज एकाच वेळी झोपायचा आणि सकाळी एकाच वेळी उठायचा प्रयत्न करा. त्यामुळे शरीराला सवय लागते.
झोपण्याआधी मन शांत करा: झोपण्याआधी थोडं स्ट्रेचिंग करा, मोठा श्वास घ्या आणि सोडा, एखादं पुस्तक वाचा किंवा कोमट पाण्याने अंघोळ करा. मोबाईल बघत झोपू नका. त्यामुळे झोप चांगली लागते.
PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?
काही महिलांना डॉक्टर झोपण्यासाठी मॅग्नेशियम देतात, त्याचा फायदा होतो. पण स्वतःच्या मनाने कोणतीही गोळी घेऊ नका. आधी तुमच्या डॉक्टरला विचारा.लक्षात ठेवा, शेवटच्या महिन्यात झोप कमी होणं हे नॉर्मल आहे. पण जर तुम्हाला रोजच झोप येत नसेल, दिवसभर त्याचा त्रास होत असेल, मोठ्याने घोरत असाल, झोपेत श्वास घ्यायला त्रास होत असेल, पाय खूप अस्वस्थ होत असतील तर डॉक्टरला नक्की भेटा. दुर्लक्ष करू नका.थोडे बदल केले, उशीचा आधार घेतला आणि मन शांत ठेवलं तर हा शेवटचा टप्पा पण आरामात निघून जाईल.