Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झुरळांच्या शरीरावर वाढणाऱ्या ‘या’ जीवाणूमुळे शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, दुर्लक्ष केल्यास अवयव होतील निकामी

घराच्या आजूबाजूला किंवा किचनमध्ये झुरळ झाल्यानंतर दुर्लक्ष न करता पेस्ट कंट्रोल करून घेणे आवश्यक आहे. झुरळांमध्ये असलेला विषाणू आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 12, 2025 | 05:30 AM
झुरळांच्या शरीरावर वाढणाऱ्या 'या' जीवाणूमुळे शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान

झुरळांच्या शरीरावर वाढणाऱ्या 'या' जीवाणूमुळे शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान

Follow Us
Follow Us:
  • झुरळांच्या शरीरातील विषाणूमुळे कोणत्या आजाराची लागण होते?
  • हेमोलिटिक यूरेमिक सिंड्रोम म्हणजे काय?
  • झुरळ घरात येऊ नये म्हणून काय करावे?
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच घरात झुरळ पाहिल्यानंतर मोठ्या मोठ्या ओरडू लागतात.किळसवाणे झुरळ घरात आल्यानंतर सगळ्यांचं घाण वाटते. घराच्या आजूबाजूला किंवा घाणीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झुरळ असतात. हेच झुरळ घरात शिरून अन्नपदार्थांचे नुकसान करतात. बऱ्याचदा झुरळ अंधाऱ्या ठिकाणी, किचनमधील कोपऱ्यात, माळ्यावर, अडगळीच्या खोलीमध्ये किंवा भांड्यावर फिरताना दिसतात. पण झुरळांच्या अंगावर असलेले घाणेरडे आणि जीवघेणे विषाणू शरीरासाठी अतिशय घातक आहेत. शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचा धोका वाढू लागतो. घरात आलेले झुरळ कमी करण्यासाठी सतत काहींना काही केले जाते.(फोटो सौजन्य – istock)

रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे नष्ट करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील प्रभावी, सर्वच शिरांमधून वाहील ऑक्सिजन

घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात झुरळांची पैदास झाल्यास सगळीकडे झुरळ फिरू लागतात. झुरळांच्या शरीरावर साल्मोनेला आणि ई. कोलाय नावाचे हानिकारक विषाणू असतात. हे विषाणू अन्नपदार्थांमधून किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीरात गेल्यामुळे ताप, अतिसार, पोटदुखी, उलट्या आणि डिहायड्रेशन इत्यादी आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. झुरळांच्या शरीरावरील गंभीर विषाणू रक्तात मिक्स झाल्यानंतर सेप्सिस सारख्या गंभीर आजरांची शरीराला लागण होते. रक्तात विषाणू मिक्स झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती उलटी प्रतिक्रिया देते, ज्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांचे आणि अवयवांचे गंभीर नुकसान होते. तसेच यामुळे सेप्टिक शॉक, अवयव निकामी होऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.

झुरळ अन्नपदार्थांमध्ये फिरल्यानंतर ई. कोलाय जीवाणू शरीरात प्रवेश करतो. पाण्यातून हा विषाणू शरीरात गेल्यानंतर आतड्यांचे गंभीर नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय अतिसार होणे, रक्तातील इन्फेक्शन किंवा हेमोलिटिक यूरेमिक सिंड्रोम होऊ शकतो. तसेच किडनीवर परिणाम झाल्यानंतर दोन्ही किडनी निकामी होऊन जातात. हा विषाणू प्रामुख्याने लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतो. ई. कोलाय विषाणू मानवी शरीरातील लाल रक्त पेशी कायमच्या नष्ट करणे, रक्तातील इन्फेक्शन वाढवणे किंवा किडनीच्या आरोग्यावर परिणाम करतो. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होतात.

जेवणानंतर घशात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? ‘या’ सवयी बदलून तात्काळ मिळवा आराम

किचनवर किंवा इतर ठिकाणी झुरळांची विष्ठा, लाळ आणि मृत शरीराचे भाग इत्यादी अनेक गोष्टी तशाच पडून राहतात. यामुळे अस्थमासारख्या गंभीर आजाराची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे झुरळांपासून बचाव करण्यासाठी घरातील भांडी किंवा आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. उघड्यावर ठेवलेली भांडी स्वच्छ पाण्याने धुवून नंतरच वापर करावा. याशिवाय फर्निचर केलेल्या घरात झुरळ होऊ नये म्हणून महिन्यातून एकदा पेस्ट कंट्रोल करून घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: This bacteria found on cockroaches can cause serious damage to the body ignoring it may lead to organ failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • cleaning tips
  • food poisoning news
  • lifestlye tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.