
रात्री वाढलेल्या कोरड्या खोकल्याचा वैताग आलाय? मग 'हा' घरगुती उपाय करून कायमचा मिळवा आराम
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये साथीच्या आजार मोठ्या प्रमाणावर पसरू लागतात. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. याशिवाय घशात वेदना होणे, घसा कोरडा पडणे, सतत खोकला, सर्दी इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. कोरडा खोकला कायमच रात्रीच्या वेळी येतो, ज्यामुळे झोप व्यवथित लागण नाही. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्य बिघडते आणि खोकला वाढू लागतो. हवामान, प्रदूषण, किंवा शरीरातील वाढलेला कफ-वात इत्यादींमुळे खोकला वाढू लागतो. एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ खोकला येत असेल तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार येणाऱ्या खोकल्यामुळे काहीवेळा डोके दुखू, रात्री झोपल्यानंतर नाक बंद होणे, गळा दुखणे, रात्री झोपल्यानंतर सतत खोकला येणे इत्यादी समस्या वाढू लागतात. काहींना रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर खूप जास्त खोकला येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे खोकल्यापासून कायमची सुटका मिळेल आणि घशाच्या समस्या कमी होतील. आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारते.
रात्री वाढलेल्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी वारंवार मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करावेत. शरीरात वाढलेल्या कफ आणि वातामुळे शरीरात वात वाढल्यामुळे आरोग्य बिघडते. रात्रीच्या वेळी आराम करताना शरीराची नैसर्गिक गती कमी होऊन जाते, ज्यामुळे घशात आणि छातीमध्ये कफ साचून राहतो. छातीमध्ये साचून राहिलेल्या कफामुळे रात्री झोपल्यानंतर खोकला वाढतो. तसेच पंख्याची थेट हवा नाकातोंडातून शरीरात गेल्यामुळे कफ कोरडा होऊन जातो. वारंवार रात्री येणाऱ्या खोकल्यामुळे काहीवेळा घशाला सूज येते.
रात्री झोपण्याआधी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे घशाच्या स्नायूंना आराम मिळेल. कोमट पाण्याच्या सेवनामुळे गळा ओलसर राहतो आणि कफ सैल होण्यास मदत होते. याशिवाय रात्री झोपण्याआधी गरम दुधात काळीमिरी पावडर, हळद आणि तूप मिक्स करून प्यावे. यामुळे खोकला आणि घशात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात मीठ मिक्स करून गुळण्या कराव्यात. गुळण्या केल्यामुळे घशात वाढलेली खवखव कमी होईल. तसेच तुळशीची पाने, निलगिरीचे पाने, ओवा टाकून पाण्याची वाफ घ्यावी.
खोकल्याची सामान्य कारणे:
सर्दी आणि फ्लूमुळे खोकला होऊ शकतो, कारण शरीर संसर्गाशी लढताना जास्त कफ तयार करते.घशातून श्लेष्मा गळती झाल्यामुळे वायुमार्गाला त्रास होतो आणि खोकला येतो.
खोकल्यावर घरगुती उपाय:
कोमट पाणी किंवा चहामध्ये मध घालून पिणे खोकला आणि छातीत जळजळ कमी करू शकते.ह्युमिडिफायर वापरणे किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.