Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात तिखट, तेलकट, लाल मांस इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2026 | 05:30 AM
पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका 'या' पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका 'या' पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणात वाढलेल्या गारव्यामुळे सगळीकडे थंडावा निर्माण झाला आहे. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे रोगराई पसरते आणि साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. पाऊस पडल्यानंतर आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. सर्दी, खोकला, जुलाब, ताप, डेंग्यू, पोटदुखी, अपचनासंबंधित आजारांची लागण झाल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटात वेदना वाढतात आणि जुलाब, उलट्या होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका, अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवून आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींवर योग्य लक्ष देणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

Menstrual Cycle: Sickle Cell Disease असलेल्या महिलांसाठी मासिक पाळीचा काळ अधिक आव्हानात्मक का ठरू शकतो?

पावसाळ्यात आहारामध्ये अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन:

हिरव्या पालेभाज्या:

दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या अतिशय आवडीने खाल्ल्या जातात. पण पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्यांचे अजिबात सेवन करू नका. पालेभाज्यांमध्ये कोबी, पालक, मेथी किंवा इतर हिरव्या भाज्यांचा आहारात अजिबात समावेश करू नका. कारण पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि फंगस इन्फेक्शनचा धोका वाढतो. भाज्यांमध्ये कीटक किंवा बॅक्टेरिया असल्यामुळे घाणीचे पदार्थ पोटात गेल्यानंतर पचनक्रिया बिघडते किंवा जुलाब, उलट्या होऊन शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.

तेलकट पदार्थ:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात अजिबात तेलकट किंवा तिखट पदार्थांचा समावेश करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात फॅट वाढण्याची शक्यता असते. तसेच सतत तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वाढून अपचनाच्या समस्या वाढतात. समोसे, भजी इत्यादी पदार्थ तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. सतत एकाच तेलात पदार्थ तळून काढल्यामुळे डायरिया किंवा पचनक्रिया बिघडून शरीराला हानी पोहचू शकते.

मशरूम:

पाऊस पडून गेल्यानंतर अनेक ठिकाणी जमिनीवर मशरूम उगवतात. हे मशरूम शरीरासाठी अजिबात चांगले नाही. जमिनीतून उगवणाऱ्या मशरूममुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. याशिवाय पावसाळ्यात डेअरी प्रॉडक्ट सुद्धा अजिबात खाऊ नये. दह्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात, ज्या शरीरासाठी अजिबात चांगल्या नाहीत.

हाडांमधून सतत कटकट आवाज येतो? वयाच्या चाळिशीनंतर आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आर्थरायटिस टाळण्यासाठी उपाय

मांसाहारी पदार्थ:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड वातावरणामुळे अनेक लोक चिकन, मटण इत्यादी मांसाहारी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. पण हे पदार्थ सतत खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच अपचनाच्या समस्या वाढतात. चिकन, मटण पचन होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे जास्त चरबी असलेले आणि लाल मांस युक्त पदार्थ अजिबात खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात सर्दी-खोकला का वाढतो?

    Ans: पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रसार वाढू शकतो. त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

  • Que: पावसाळ्यात कोणते पदार्थ टाळावेत?

    Ans: जास्त तेलकट, तळलेले पदार्थ, उघड्यावरचे खाद्यपदार्थ, अस्वच्छ पाणी आणि पचनास जड पदार्थांचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरू शकते.

  • Que: पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?

    Ans: ताजे फळे, हिरव्या भाज्या, मसाले (हळद, आले), पुरेसे पाणी आणि पौष्टिक आहार घेणे शरीराची प्रतिकारशक्ती टिकवण्यास मदत करू शकते.

Web Title: To avoid colds and coughs during the monsoon do not include these foods in your diet at all otherwise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • monsoon care

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
2

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
3

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
4

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.