शरीरात वाढलेला लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' जांभळ्या फळाचे सेवन
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळे उपलब्ध असतात. ताडगोळे, करवंद, फणस,आंबे इत्यादी रानमेवा मिळतो. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा प्रोटीनशेकचे सेवन केले जाते. मात्र काहीवेळा वजन कमी करण्यासाठी प्यायले जाणारे प्रोटीनशेक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करू नये.(फोटो सौजन्य – iStock)
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात तुम्ही जांभळाचे सेवन करू शकता. जांभळं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभळं उपलब्ध असतात. चवीने तुरट असलेली जांभळं त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जांभळं खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे आहारात तुम्ही जांभळाचा रस किंवा जांभळ्यांच्या पावडरचे सेवन करू शकता.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे शरीराच्या इतर अवयवांना इजा पोहचते. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. मधुमेह झाल्यानंतर जांभळं खावी. जांभळं खाल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. जांभळांसोबतच जांभळाच्या बियांमध्ये अल्कलॉईड नावाचा घटक आढळून येतो. जो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
जांभळांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरातील रक्त शुद्ध होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले जांभूळ हे फळ नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्त शुद्ध होईल. याशिवाय जांभळाच्या सालींचा वापर रक्त शुद्ध करण्याऱ्या औषधांमध्ये वापरले जाते. रक्त शुद्ध झाल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात.
आंब्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं! जाणून घ्या रसाळ आणि मधुर आंबा खाण्याची योग्य वेळ
जांभळाचे सेवन केल्यामुळे कानाच्या आजारांपासून सुटका मिळते. सतत हेडफोनस वापराने, मोठ्या आवाजात बोलणे किंवा इतर काही कारणांमुळे कानासंबंधित समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. यासोबतच आहारात जांभळं खाल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.