पाण्याच्या एका घोटानेच छातीत साचलेलं सर्व पित्त येईल बाहेर, काही सेकंदातच ॲसिडिटीने फुगलेलं पोट होईल रिकामं
आजकालच्या धावपळीच्या जगात अनेकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी फार बिघडल्या आहेत. आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करत सतत खाल्ल्या जाणाऱ्या फास्ट फूडच्या सेवनाने आपली पचनक्रिया डगमगते. यामुळे मग पुढे जाऊन ॲसिडिटी, अपचन अशा समस्या निर्माण होतात. अनेकदा गोळ्या घेऊनही आपले पोट नीट साफ होत नाही आणि सततची ही समस्या त्रासदायक ठरते. अशात आज आम्ही तुम्हाला एक साधा-सोपा पण प्रभावी असा घरगुती उपाय सांगत आहोत जो तुम्हाला काही मिनिटांतच पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवून देऊ शकतो.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कायमचा होईल नष्ट! शँम्पूमध्ये मिक्स करा ‘हे’ औषधी पाणी, केस होतील स्वच्छ
यासाठी तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा महागड्या साहित्याची आवश्यकता नाही. तर फक्त थंड पाण्याच्या मदतीने तुम्ही पोटातील त्रास लवकर कमी शकता. आज आपण Vagus Nerve Activation च्या मार्गाने पोटाच्या समस्यांना दूर कसे करायचे ते जाणून घेणार आहोत. चला हा उपाय नेमका काय आहे आणि कसा करायचा याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
तुम्हालाही जर पोटाच्या समस्या जाणवत असतील जसे की जळजळ होणे किंवा मळमळ वाढणे अथवा पोट फुगलेलं वाटतं अशात थंडगार पाण्याचा एक घोट तुमच्या सर्व समस्यांना टाटा गुड बाय करू शकतं. यासाठी काही सेकंद पाण्याचा एक घोट तोंडात घ्या आणि तोंडातच सौम्यपणे फिरवत रहा. काही वेळाने हे पाणी थुकून टाका किंवा पिऊन घ्या. हा उपाय दर ५ मिनिटांतून ४-५ वेळा करा. यामुळे आपल्या शरीरातील Vagus Nerve सक्रिय होते, जी पचनक्रिया नियंत्रित करण्यास मदत करते. पाणी थंड असल्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो.
Vagus Nerve म्हणजे काय?
आपल्या शरीरात Vagus Nerve ही एक महत्त्वाची मेंदूशी जोडलेली नर्व्ह आहे, जी पचनतंत्राचे रेग्युलेशन करते.या नर्व्हच्या मदतीने शरीरातील वाढलेलं आम्ल्पित्त कमी होण्यास मदत होते. थंड पाणी तोंडात धरल्यामुळे ही नर्व्ह उत्तेजित होते आणि पोट शांत राहू लागतं. यामुळे समस्येच्या मूळ कारणावर उपचार करता येतो. हा उपाय मेंदू आणि पोट यंत्रणेला नैसर्गिक मार्गाने स्थिर करतो.
ॲसिडीटीवर प्रभावी उपाय
अनेकदा प्रवासात अरबट चरबट खाल्लं की मग ॲसिडीटीचा त्रास जाणवतो. अशात आपल्याजवळ औषध नसतात. पण जवळ पाणी नसेल तर उपाय सहज करता येतो. पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास पोटातील गॅस आणि उष्णतेचा त्रास दूर करता येतो. विशेषतः जेव्हा तुम्हाला उलटीसारखं वाटत असेल किंवा डोकं दुखत असेल तेव्हा हा उपाय तुम्हाला काही मिनिटांतच आराम मिळवून देईल. यामुळेच कधीही प्रवास करताना आपल्यासोबत एक थर्मस किंवा पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा.
पांढऱ्या भिंतीवरील हट्टी डाग क्षणातच होतील दूर; या जुगाडाने घरातील कोपरान कोपरा करा साफ
थंड पाणी तोंडात घेऊन हा उपाय केला की त्यांनतर काहीवेळ कोणतेही अन्न खाऊ नका. कमीत कमी ३ ते ४ तासानंतर तुम्हाला हवं ते खा पण तोपर्यंत पोटाला आराम द्या. यामुळे पोट पूर्णपणे शांत होण्यास आणि पोटातील सर्व ॲसिड बाहेर पडण्यास मदत होते. त्यानंतरही हलकं आणि पचायला सोपं असणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. त्रास कमी झाला की मग तुमच्या आवडीचे पदार्थ पुन्हा खाण्यास सुरुवात करा. मात्र कोणताही आहार या योग्य वेळेत आणि प्रमाणात खाण्याची सवय शरीराल आवर्जून लावून घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.