केसांमध्ये वाढलेला कोंडा कायमचा होईल नष्ट! शँम्पूमध्ये मिक्स करा 'हे' औषधी पाणी
केसांची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. केस स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या शँम्पूचा वापर केला जातो. मात्र बऱ्याचदा रासायनिक पदार्थांपासून बनवलेला शँम्पू केस खराब आणि कोरडे करून टाकतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. अनेक ब्यूटी एक्स्पर्टस आणि डर्माटॉलॉजिस्ट केस स्वच्छ करताना पाण्यात शॅम्पू मिक्स करून मगच लावण्याचा सल्ला देतात. मात्र घाईगडबडीमध्ये महिला शॅम्पू थेट हातांवर घेऊन केसांवर लावतात आणि केस पाण्याने स्वच्छ करतात. केसांवर शॅम्पू पाण्यात मिक्स करून लावल्यास अनेक फायदे होतात. त्यामुळे कधीही शँम्पू पाण्यात मिक्स करूनच लावावा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा वाढण्याची शक्यता असते. कारण दमट वातावरणामुळे केस अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जातात.केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर तो कमी करण्यासाठी हेअर मास्क किंवा इतरही अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे केसांमध्ये खाज येणे, कोंडा कपड्यांवर पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. केस स्वच्छ करताना औषधी पाणी शँम्पूमध्ये मिक्स करून लावल्यास केस चमकदार आणि सुंदर होण्यासोबतच केसांमधील कोंडा कमी होईल.
बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक रसायनांचा केसांवर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी शँम्पूमध्ये औषधी पाणी मिक्स करावे. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल. केसांसाठी मेथीचे दाणे आणि कढीपत्त्याची पाने प्रभावी आहेत. यामुळे केस स्वच्छ होण्यास मदत होईल. कढीपत्ता आणि मेथीचे पाणी केसांवर लावल्यास केस तुटणे किंवा केसांसंबधित सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.
औषधी पाणी तयार करताना सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी घेऊन हलकेसे गरम करून घ्या. त्यानंतर उकळी आलेल्या पाण्यात मेथीचे दाणे, कढीपत्त्याची पाने घालून व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. तयार केलेले पाणी थंड करा. थंड झालेल्या पाण्यात धुतलेल्या तांदळाचे पाणी घालून मिक्स करा आणि त्यात आवश्यकतेनुसार शँम्पू घालून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण केस स्वच्छ करताना वापरल्यास केसांमधील कोंडा कमी होईल आणि केस स्वच्छ होण्यास मदत होईल. केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाणे आणि कढीपत्त्याचे पाणी प्रभावी ठरते.