
थंडीत ही भाजी चुकूनही खाऊ नका, युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास नकोसा होईल; हाडांमध्येही वाढतील वेदना
आपण जे काही खातो त्याचा थेट परीणाम आपल्या शरीरावर होत असतो. हिवाळ्यात काही पदार्थांचे सेवन शरीरातील युरीक ॲसिड लक्षणीयरित्या वाढवते ज्यामुळे हाडे आणि सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात. हाडांमध्ये तीव्र वेदना होत असतील तर यासाठी औषधांची गरज नाही तर फक्त तुमच्या आहारात तुम्हाला बदल करण्याची गरज आहे. योग्य पदार्थांचे सेवन करुन आणि आहारातील काही पदार्थ टाळून तुम्ही तुमचे आरोग्या सुधारु शकता. तुम्हालाही हातापायांमध्ये जडपणा, सांध्यांमध्ये जळजळ जाणवत असेल तुम्ही आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ते जाणून घ्या.
शरीरात युरिक अॅसिड का वाढतं
युरिक अॅसिड हे शरीरातील टाकाऊ पदार्थ आहेत जे रक्तात आढळून येतात. हे पदार्थ विषारी नसले तरी त्यांची मात्रा जर वाढली तर शरीरावर याचा ताण पडू शकतो. किडणी शरीरातील यूरिक अॅसिडला बाहेर टाकण्याचे काम करते पण जर याची कार्यक्षमता कमी झाली तर हे यूरिक अॅसिड रक्तात साचू लागते. असं झाल्यास याचा परीणाम आधी सांध्यांवर दिसून येतो ज्यामुळे वेदना होऊ लागतात. काही लोकांना बोटांचा पायांपासून वेदना जाणवू लागतात. शरीरात प्यूरीनचे प्रमाण वाढू लागले की युरिक अॅसिड आपोआप वाढू लागतो. अशात आपल्या आहारातील काही पदार्थच शरीरात प्यूरिन वाढवण्याचे काम करत असतात. या पदार्थांचे सेवन वेळीच टाळले नाही तर शरीराच्या वेदना दुपटीने वाढू शकातात.
ही भाजी वाढवते शरीरातील युरिक अॅसिड
भेंडी ही एक अशी भाजी आहे जी जवळजवळ प्रत्येकाच्या घरी बनवली आणि खाल्ली जाते. ही भाजी, हलकी आणि पचायला सोपी आहे म्हणून अनेकजण याचे सेवन करु पाहतात. मात्र अनेकांना ठाऊक नाही की, भेंडीचे सेवन शरीराच युरिक अॅसिडचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढवण्याचे काम करत असते. भेंडीमध्ये प्यूरीनचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे युरिक अॅसिड झपाट्याने शरीरात वाढत. परिणामी सांध्यांमध्ये जळजळ, वेदना आणि सूज अशा समस्या वाढू लागतात. अनेक तज्ञही भेंडीचे सेवन टाळण्याचा सल्ला देतात.
चुकीच्या आहार समस्या वाढवतो
आताच्या काळात अनेकांच्या आहारात चुकीच्या आहारामुळे वाढणाऱ्या समस्या रेड मीट, प्रोसेस्ड फूड आणि माशांचे अधिक प्रमाण आढळून येते. हे असे पदार्थ आहेत ज्यामध्ये प्यूरिनचे सर्वाधिक प्रमाण आढळून येते. यासहच जर तुम्ही अल्कोहोल किंवा धूम्रपानाचे सेवन करत असाल तर त्याचा किडनीवर ताण पडतो ज्यामुळे शरीराचे शुद्धीकरण होण्यास अडथळा निर्माण होतो. हाडांमध्ये होणाऱ्या वेदना, सांध्यामधील त्रास आणि सतत पायांना मुंग्या येणे हे सर्वच संकेत आहेत की तुम्ही आहाराचे सेवन करत आहात.
सावधान! बालकांमध्ये वाढतंय हृदयविकाराचे प्रमाण, हृदयदोषासह बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम
युरिक अॅसिड कमी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ?
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी कमी प्युरीनयुक्त पदार्थांचे सेवन सुरु करा. जास्तीत जास्त पाणी प्या आणि आपल्या आहारात फळे, डाळी, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.