आतडयांना आलेली सूज कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात 'या' पदार्थांचे करा सेवन
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरात सर्वच अवयवांना पोषणाची आवशक्यता असते. त्यामुळे शरीरातील कोणत्याही अवयवांना इजा झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. शरीरात दोन आतडे असतात. लहान आणि मोठे आतडे जेवण पचनवण्यासाठी आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी आतडे निरोगी असणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा पोटातील आतडयांना सूज येण्याची शक्यता असते. आतडयांना आलेली सूज शरीराची पचनक्रिया बिघडून टाकतात. याशिवाय पोटात जळजळ, अपचन, पोटात दुखणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – iStock)
डिजिटल युगात वाढतोय Cervical Pain चा धोका! लक्षणे ओळखून वेळीच घ्या योग्य ते औषध उपचार
जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे अनेकदा पोटामध्ये जळजळ वाढू लागते. पोटात वाढलेल्या जळजळमुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतडयांना आलेली सूज कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
आतडयांना सूज आल्यानंतर शरीराचे कार्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे दैनंदिन आहारात दही किंवा ताकाचे सेवन करावे. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीरात चांगल्या आतड्यांमधील बॅक्टरीया वाढतात, ज्यामुळे आतड्या निरोगी राहतात. तुम्हाला जर आतड्यांसंबंधित समस्या उद्भवत असतील तर नियमित दह्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया चांगली राहील.
जेवणातील पदार्थ बनवताना कांद्याचे सेवन करावे. कांदा खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर नियमित एक लसूण खाल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि इतर समस्यांपासून सुटका मिळेल. कांद्याचे सेवन नियमित जेवणात करावे. कांदा आणि लसूण खाल्यामुळे शरीरात चांगल्या बॅक्टरीयांची वाढ होते आणि आतड्या निरोगी राहतात.
हिरव्या पालेभाज्यांचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. हिरव्या पालेभाज्या सहज पचतात. याशिवाय यामध्ये असलेले गुणकारी गुणधर्म शरीराला फायदेशीर ठरतात.